एक्स्प्लोर

विमानतळ नामकरणाबाबत केंद्र सरकारनं धोरण निश्चित करावं; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

नवी मुंबई विमानतळावर झालेल्या आंदोलनावरुन उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून व्यक्तींऐवजी विमानतळांना शहरांची नावं देण्याच्या धोरणाचं काय झाल असा सवालही सरकारला केला आहे.

मुंबई : विमानतळाच्या नामकरणाबाबत केंद्र सरकारनं देशभरात एकसुत्री धोरण निश्चित करावं, त्यासाठी केंद्र सरकारच्या नवनियुक्त नागरी उड्डाण मंत्र्यांनी पुढाकार घेऊन धोरण निश्चित करण्यास प्रथम प्राधान्य द्यावं, असं मतं शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलं. यासंदर्भात केंद्र सरकारला 16 जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

कोणत्याही विमानतळाचं नामकरण करताना किंवा नाव बदलताना केंद्र सरकारनं एकसमान धोरण ठरवाव, अशी मागणी करत वकील फिलजी फ्रेडरिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच हे धोरण निश्चित होईपर्यंत नवी मुंबई विमानतळासह इतर विमानतळांच्याही नामकरणाबाबत राज्य सरकारनं पाठविलेल्या प्रस्तावांवर केंद्राने विचार करु नये, अशी विनंती याचिकाकर्त्यानी या याचिकेतून केली आहे. त्यावर शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं विमानतळाच्या नामकरणाबाबत आपलं मत व्यक्त केलं. 

मागील महिन्यात नवी मुंबईतील विमानतळाला दिवंगत सामाजिक कार्यकर्ते आणि माजी खासदार दि.बा.पाटील यांचं नाव द्यावं यासाठी 25 हजारांच्या संख्येने स्थानिक नागरिक रस्त्यावर आले आणि त्यांनी आंदोलन केले. यावेळी कोरोनाशी लढा देताना पाळाव्या लागणाऱ्या सर्व खबरदाऱ्यांना तिलांजली देण्यात आली होती. तर दुसरीकडे, महिन्याच्या सुरुवातीला सिडकोनेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव ग्रीनफिल्ड विमानतळाला देण्याचं घोषित केलंय. 

मुळात साल 2016 मध्ये विमानतळांना कोणत्याही व्यक्तींची नावं न देता शहरांची नावे देण्याबाबत एका धोरणाचा मसुदा निश्चित करण्यात आला होता. त्या धोरणाचं काय झाले? त्या धोरणाच्या अंमलबजावणीबाबत सद्यस्थिती काय आहे? ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे अशी विचारणा उच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडे केली आहे. तसेच मागील महिन्यात कोरोनाच्या नियमावलीची पायमल्ली करून 25 हजार नागरिक एकत्र रस्त्यावर आले होते. त्याला परवानगी कोणी दिली? अशी विचारणाही उच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्यावतीने उपस्थित असलेल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांना केली. जर त्या धोरणातील मसुद्यात काही नव्याने सामील करायचे असल्यास ते आत्ताच करा. जेणेकरून केंद्राच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला असून नवनियुक्त नागरी उड्डाण मंत्री (ज्योतिरादित्य सिंधिया) यात तातडीनं लक्ष देऊ शकतील असं मतही उच्च न्यायालयानं व्यक्त केलं. 

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Crime News : वीस वर्षांपासून बंद घरात पोलीस पोहचले, फ्रिज उघडताच धक्कादायक वास्तव उघड, पोलिसांनाही घाम फुटला!
वीस वर्षांपासून बंद घरात पोलीस पोहचले, फ्रिज उघडताच धक्कादायक वास्तव उघड, पोलिसांनाही घाम फुटला!
Nitish Kumar: तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी

व्हिडीओ

Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitish Kumar: तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
Gold-Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
Nashik Crime News: WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
Harbhajan Singh: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
Video: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
Embed widget