एक्स्प्लोर

Petrol Diesel Price Today : देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा पेट्रोल-डिझेलवर परिणाम? जाणून घ्या, आजचे दर

Petrol-Diesel Price Today : इंधन कंपन्यांनी नववर्षाच्या दुसऱ्या दिवशी ग्राहकांना दिलासा दिला आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Petrol-Diesel Price 02 January 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) चे ताजे दर जारी केले आहेत. राष्ट्रीय बाजारात नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच, आज 2 जानेवारी 2022 रोजीही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. देशपातळीवर पेट्रोल-डिझेलच्या किमती (Fuel Price) स्थिर आहेत. 

भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. आजही तेलाच्या किमती स्थिर आहेत. राजधानी दिल्लीसह देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बदल करण्यात आलेला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या दोन महिन्यांत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. 

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे. 

देशातील इतर राज्यांची स्थिती 

देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेयरमध्ये विकलं जात आहे. जिथे पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. राज्य स्तरावर वाहनांच्या इंधनावर लावण्यात येणाऱ्या व्हॅटच्या (VAT) वेगवेगळ्या दरांमुळे राजस्थानमध्ये सर्वात महाग पेट्रोल-डिझेल विकलं जात आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल (Petrol) 112 रुपये प्रति लिटर आहे. महानगरांबाबत बोलायचं झालं तर दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Rate) सर्वात स्वस्त आहे. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल आणि डिझेल दोन्हींच्या किमतींमध्ये इतर महानगरांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. दिल्ली व्यतिरिक्त इतर सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलनं शतक पार केलं आहे. 

देशात ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी इंधानाच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. जाणून घेऊया वेगवेगळ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती 

देशातील प्रमुख शहरं  पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर 
मुंबई 109.98  94.14
दिल्ली 95.41  86.67
चेन्नई 101.40 91.43
कोलकाता 104.67 89.79
पाटणा 105.92 91.09

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget