Petrol Diesel Prices Today 24 June : इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री, पेट्रोल लवकरच 110 रुपये होण्याची शक्यता
Petrol Diesel Prices Today 24 June : श्रीगंगानगर, अनूपपुर, रीवा यांसारख्या काही शहरांत पेट्रोलची किंमत 110 रुपये लिटरच्या जवळ पोहोचली आहे. तसेच बंगळुरुनंतर आता बिहारची राजधानी पटना आणि केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्येही पेट्रोल शंभरी पार जाण्याची शक्यता आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर 103.89 रुपये आणि डिझेल 88.30 रुपये प्रति लिटर आहे.
Petrol Diesel Prices Today 24 June : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बुधवारी स्थिर असल्याचं पाहायला मिळालं होतं, त्यानंतर आज (गुरुवारी) पुन्हा एकदा इंधन दरांत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. पुन्हा एकदा वाढलेल्या दरवाढीमुळे देसभरात इंधनाच्या दरांत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आज पेट्रोलचे दर 26 पैसे आणि डिझेल 7 पैसे प्रति लिटर महाग झालं आहे. वाढलेल्या दरांसह आज दिल्ली पेट्रोल 97.76 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 88.30 रुपये प्रति लिटर विकण्यात येत आहे.
श्रीगंगानगर, अनूपपुर, रीवा यांसारख्या काही शहरांत पेट्रोलची किंमत 110 रुपये लिटरच्या जवळ पोहोचली आहे. तसेच बंगळुरुनंतर आता बिहारची राजधानी पटना आणि केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्येही पेट्रोल शंभरी पार जाण्याची शक्यता आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर काय?
मुंबईत आज पेट्रोल 103.89 रुपये आणि डिझेल 88.30 रुपये प्रति लिटर
कोलकातामध्ये आज पेट्रोल 97.63 रुपये आणि डीझेल 91.15 रुपये प्रति लिटर
चेन्नईत आज पेट्रोल 98.88 रुपये आणि डिझेल 92.89 रुपये प्रति लीटर
श्रीगंगानगरमध्ये आज पेट्रोल 108.94 रुपये आणि डिझेल 101.48 रुपये प्रति लिटर
पटनामध्ये पेट्रोल 99.80 रुपये आणि डिझेल 93.63 रुपये प्रति लिटर
अनूपपूरमध्ये आज पेट्रोल 108.56 रुपये आणि डिझेल 99.39 रुपये प्रति लिटर
रीवामध्ये आज पेट्रोल 108.2 रुपये आणि डिझेल 99.05 रुपये प्रति लिटर
लखनौमध्ये आज पेट्रोल 94.95 रुपये आणि डिझेल 88.71 रुपये प्रति लिटर
चंदीगढमध्ये आज पेट्रोल 94.02 रुपये आणि डिझेल 87.94 रुपये प्रति लिटर
महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतीत घट होत असताना भारतात मात्र इंधनाच्या दरात वाढ होत आहे.
देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Corona Update India : देशात गेल्या 24 तासांत 50 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, तर सक्रिय रुग्णसंख्या 6 लाखांहून अधिक
- Delta Plus : डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रभाव वाढण्याची शक्यता, राज्यांनी खबरदारी घ्यावी, केंद्राचे निर्देश
- World's Biggest Philanthropist: ना बिल गेट्स, ना वॉरेन बफेट... गेल्या 100 वर्षातील जगातील सर्वात दानशूर व्यक्ती भारतीय