एक्स्प्लोर

Corona Update India : देशात गेल्या 24 तासांत 50 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, तर सक्रिय रुग्णसंख्या 6 लाखांहून अधिक

Corona Update India : गेल्या 24 तासांत  54,069 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1321 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मंगळवारी 50,848 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या 24 तासांत 68,885 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. 

Corona Update India : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, धोका अद्याप टळलेला नाही. देशात पुन्हा एकदा 50 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत  54,069 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1321 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मंगळवारी 50,848 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या 24 तासांत 68,885 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. 

देशात सलग 42व्या दिवशी कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णांहून अधिक कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा आहे. 23 जूनपर्यंत देशभरात 30 कोटी 16 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 64 लाख 89 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 39 कोटी 78 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 19 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे. 

देशातील आजची कोरोना स्थिती

एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 82 हजार 778
कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा : दोन कोटी 90 लाख 63 हजार 740
एकूण सक्रिय रूग्ण : 6 लाख 27 हजार 57
एकूण मृत्यू : 3 लाख 91 हजार 981

मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोनाबाधित वाढले, 10,066 नवीन कोरोनाबाधित तर 11,032 रुग्ण कोरोनामुक्त 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. मात्र मंगळवारच्या तुलनेत काल कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. काल 10,066 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 11,032 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मंगळवारी 8 हजार 470 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती आणि 9 हजार 046 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. 

आता राज्यभरात बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,53,290 इतकी झाली आहे. काल (बुधवारी) 163 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.99 टक्के एवढा आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.93 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 163 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.99 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,01,28,355 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,97,587  (14.95 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,92,108 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,223 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात काल रोजी एकूण 1,21,859 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रभाव वाढण्याची शक्यता, राज्यांनी खबरदारी घ्यावी, केंद्राचे निर्देश

महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशनंतर आता देशाच्या इतर भागातही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना, विशेषत: महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांना खबरदारी घेऊन तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत. 

बुधवारपर्यंत भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 40 रुग्ण सापडले आहेत. केरळमधील तीन जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण सापडल्याने खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत. महाराष्ट्रात जळगाव आणि रत्नागिरीमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण सापडले आहेत. तामिळनाडूमध्येही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा एक रुग्ण सापडला आहे. 

डेल्टा प्लस व्हेरिएंट हा आतापर्यंत 11 देशांमध्ये सापडला आहे. आसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडून डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा अभ्यास करण्यात येत आहे. 

डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार हा वेगाने होत असून त्यामुळे फुफ्फुसांच्या पेशींना हानी पोहोचते. डेल्टा प्लसवर काय उपचार घेता येतील तसेच याच्या विरोधात शरीरात अॅन्टिबॉडीज् तयार होतात का याची अद्याप माहिती नाही. त्यामुळे मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन या कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget