एक्स्प्लोर

Petrol and Diesel Price Today: देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती वधारल्या? एका क्लिकवर पाहा तुमच्या शहरातील दर

Petrol and Diesel Price: भारतीय तेल कंपन्यांकडून देशात पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. देशातील काही शहरांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत तर काही शहरांमध्ये दर कमी झाले आहेत

Petrol Diesel Rates on 10th April 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. आजच्या कच्च्या तेलाच्या किमतींबाबत बोलायचं झालं तर शुक्रवार 7 एप्रिल रोजी किमतीत किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे.

डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल 0.25 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल 80.89 डॉलरवर व्यापार करत आहे.  तर, ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 0.44 टक्क्यांनी वाढून किंमत 85.32 डॉलर प्रति बॅरल झाली. दरम्यान, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलल्या आहेत. अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत तर काही शहरांमध्ये दर कमी झाले आहेत. त्याचबरोबर देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

देशातील कोणत्या शहरात किती दर? 

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 15 पैशांनी वाढून 96.62 रुपये आणि डिझेल 89.81 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. नोएडामध्ये पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. येथे पेट्रोल 96.65 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लीटर आहे. तर गुरुग्राममध्ये पेट्रोल 18 पैसे प्रति लिटर 96.66 रुपये आणि डिझेल 89.54 रुपये प्रति लिटर असून चंदीगडमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. तर पाटणामध्ये पेट्रोलचा दर 18 पैशांनी स्वस्त झाला असून 107.24 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 94.04 रुपये प्रति लिटर इतका आहे. जयपूरमध्ये पेट्रोल 32 पैशांनी स्वस्त झाले असून सध्या 108.16 रुपयांना मिळतंय. त्याचवेळी, डिझेलची किंमत 29 पैशांनी स्वस्त झाली असून डिझेल 93.43 रुपये प्रति लिटरने मिळतंय. 

राज्यातील कोणत्या शहरात किती दर? 

नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59  रुपये प्रति लिटर
पुणे : पेट्रोल 105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
कोल्हापूर : पेट्रोल 106.92 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.44 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद : पेट्रोल 108.75 रुपये, डिझेल 95.45 रुपये प्रति लिटर 
परभणी : 109.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर
नाशिक : पेट्रोल 106.86  रुपये प्रति लिटर, डिझेल 93.36 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget