एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता पिंडदानही होणार ऑनलाईन
मुंबई : पितृपक्षात आपल्या पूर्वजांना पिंडदान करण्याची सुविधा आता ऑनलाईन मिळणार आहे. अलाहाबादसोबतच अनेक धार्मिक स्थळांवर पिंडदान आणि अंत्यसंस्काराची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.
17 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या पितृपक्षासाठी दरवर्षी लाखो भाविक विविध तीर्थक्षेत्रांवर जाऊन पिंडदान करतात. अनेकांना तीर्थक्षेत्रावर जाऊन पिंडदान करणे शक्य होत नाही. त्यामुळे ऑनलाईन पिंडदान सेवेमुळे अशा लोकांना मदत होणार आहे.
अलाहाबाद, हरिद्वार आणि गयासारख्या तीर्थक्षेत्रांवर पितृपक्षात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. तीर्थक्षेत्रावरील पंडितांच्या कामात वाढ झाल्याने त्यांनाही वेळ नसतो. बऱ्याचदा पंडितांना आपल्या पितरांची माहिती व्हॉट्सअप आणि ईमेलद्वारे पाठवली जाते. प्रवासापासून वाचण्यासाठी आणि व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकांना या व्हर्च्यूअल स्पेसचा आधार घ्यावा लागतो. या ऑनलाईन सुविधेमुळे पंडित आणि भाविक दोघांनाही फायदा होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement