एक्स्प्लोर

Cold Wave : काळजी घ्या! हवेची गुणवत्ता ढासळली, फुफ्फुस आणि श्वसनाच्या आजारांचा धोका वाढला

Air Pollution : गेल्या काही दिवसांपासून मुंबई, दिल्लीसह देशातील अनेक शहरांतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. या हिवाळ्यात फुफ्फुस आणि श्वसनाचे आजारांचा धोका वाढणार असल्याचा अंदाज आहे.

Mumbai Air Pollution : देशभरात (India) एकीकडे थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळत आहे. त्यातच मुंबई (Mumbai), नवी मुंबईच्या (Navi Mumbai) हवेची गुणवत्ता दिल्लीच्या हवेप्रमाणे ढासळली आहे. देशात विशेषत: उत्तर भारतात थंडीची लाट आहे. उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी आहे. राजधानी दिल्लीत थंडीने अनेक विक्रम मोडले आहेत. महाराष्ट्रतही पारा कमालीचा घसरला आहे. थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हिवाळ्यात हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या खूप वाढली आहे.

दरम्यान, दिल्लीतील एलएनजेपी हॉस्पिटलचे एमडी डॉ. एस कुमार यांनी फुफ्फुस आणि श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. या हिवाळ्यात खोकल्याचे रुग्ण वाढण्याचा अंदाज  आहे. हवामानाचा परिस्थिती अशीच राहिल्यास संपूर्ण जानेवारीत मुंबईकरांना खराब हवामानाचा त्रास सहन करावा लागू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

विनाकारण घराबाहेर पडणे टाळा

डॉ. एस कुमार यांनी सांगितले आहे की, 'वाढलेली थंडी आणि खराब हवेच्या गुणवत्तेमुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, उच्च रक्तदाब आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पूर्वी दिवसाला 40 ते 50 रुग्ण दाखल होत होते, पण आता ही संख्या वाढून 60 ते 70 पर्यंत वाढली आहे.' लोकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

मुंबईची हवाही वाईट श्रेणीत

मुंबईची हवा अत्यंत प्रदूषित झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाही शहराचे वातावरण वाईट आणि अत्यंत खराब श्रेणीत पोहोचण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हिवाळ्याच्या मोसमात शहरातील हवा अनेकदा खराब होते. तसेच हवामान बदलामुळे हवेच्या गुणवत्तेवरही परिणाम होत असतो. गेल्या आठवड्यात खराब श्रेणीत असलेली हवेची गुणवत्ता रविवारी अत्यंत खराब श्रेणीत पोहोचली होती. रविवारी मुंबई शहराची हवेची गुणवत्ता 305 एक्यूआयसह अत्यंत खराब श्रेणीत नोंदवण्यात आली. संपूर्ण जानेवारीत हवा खराब राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घ्या

डॉक्टरांच्या मते, कडाक्याच्या थंडीत लोकांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास, श्वसनाचे विकार  आणि ह्रदयासंबंधित समस्या असणाऱ्यांनी त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून घ्यावी. त्याचबरोबर थंडीच्या लाटेत सकाळी बाहेर पडणे आणि व्यायाम करणे टाळावे तसेच उबदार कपडे घालावेत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report NCP :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?Special Report Amol Mitkari VS Suresh Dhas : धस हेच बीडच्या इतिहासातील आका, मिटकरींचे गंभीर आरोपSpecial Report Uddhav Thackeray : मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंच्या शिवसेनेचं एकला चलो रे?Zero Horu Washington : हिमवादळानं वॉशिग्टनमध्ये वाहतूक मंदावली, परिस्थिती काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
Embed widget