एक्स्प्लोर

Parsi New Year 2021: आज साजरं केलं जातंय पारशी नववर्ष; पारशी समुदायासाठी 'नवरोज'चं महत्त्व काय?

Parsi New Year 2021 : पारशी नवरोजची परंपरा ही तीन हजार वर्षांपासून असल्याचं सांगितलं जातं. आजच्या दिवशी फायर टेम्पल किंवा अग्यारी मध्ये जाऊन ईश्वराची पूजा करणं हे पारशी समुदायासाठी पवित्र समजलं जातं. 

Parsi New Year 2021 Navroz : महान परंपरा, बंधुभाव, करुणा आणि इतरांबद्दल आदर व्यक्त करणारा दिवस म्हणजे 'नवरोज'. पारशी समुदायाकडून नवरोज म्हणजे पतेती हा दिवस नववर्ष म्हणून साजरा केला जातोय. पारशी कालगणनेप्रमाणे आजपासून त्यांच्या नवीन वर्षाला सुरुवात होते. आजच्या या दिवसाला 'जमशेद-ए-नवरोज' असंही म्हटलं जातं. भारताच्या विकासात पारशी समुदायाचे महत्वपूर्ण योगदान आहे. 

नवरोज हा दिवस पारशी समुदायासाठी अत्यंत महत्वाचा असून आजचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिवशी पारशी समुदाय नवीन कपडे परिरधान करुन प्रार्थना करतात, समुदायातील इतर लोकांच्या भेटी घेतात, एकमेकांना मिठाईचे वाटप करतात. आजच्या दिवशी पारशी समुदायाकडून ईश्वराची पूजा केली जाते, ईश्वरासमोर मेणबत्ती लावली जाते आणि घरातही आकर्षक लायटिंग केली जाते. आजच्या दिवशी फायर टेम्पल किंवा अग्यारी मध्ये जाऊन आज ईश्वराची पूजा करणं हे पारशी समुदायासाठी पवित्र समजलं जातं. 

पारशी नवरोजची परंपरा ही तीन हजार वर्षांपासून असल्याचं सांगितलं जातं. पारशी नववर्ष हे इराणी किंवा 'शहनशाही कॅलेंडर' प्रमाणे साजरे केले जाते. या कॅलेंडरची निर्मिती पर्शियन राजा जमशेद यांने केली होती. नवरोज हा दिवस झोराष्ट्रीयन वर्षाचा पहिला दिवस आहे. ही दिवस म्हणजे पारशी आणि इराणी समुदायामध्ये शांती आणि मैत्रीची भावना वाढवणारा दिवस असतो. 

पारशी समाज मूळचा इराण या देशातील. या देशाचे पूर्वीचे नाव म्हणजे पर्शिया, पारशी लोकांचे वास्तव्य असलेला देश. पण चौदाव्या शतकात इराणमध्ये धर्म परिवर्तनाचे वारे सुरु झाले आणि पारशी लोकांवर अत्याचार करण्यात येऊ लागला. त्यामुळे पारशी समुदायाने तो देश सोडला. यापैकी मोठा समुदाय हा भारतात आला आणि मुंबईत वास्तव्य करु लागला. 

देशाच्या विकासात पारशी समुदायाचे मोठं योगदान आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून पारशी समुदायाची लोकसंख्या घटत असून ती एक चिंतेची बाब ठरत आहे. त्यांची लोकसंख्या वाढावी म्हणून भारत सरकारने जियो पारशी ही योजना सुरु केली आहे. त्यामुळे पारशी समाजाला भारतीय कायद्याप्रमाणे दोन अपत्यांचं बंधन लागू होत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP MajhaMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Embed widget