एक्स्प्लोर

लंकेश, पानसरे, कलबुर्गींच्या हत्येत एकाच शस्त्राचा वापर

महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उजव्या विचारसरणीसाठी काम करणारा एक गट कार्यरत आहे. या गटाकडून लंकेश, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या केल्या.

बंगळुरु : पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमारे यानेच केली असल्याची माहिती विशेष तपास पथकाने पीटीआयला दिली. तसेच, गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकाच शस्त्राचा वापर करण्यात आल्याचंही एसआयटीने म्हटलं आहे. गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम एम कलबुर्गी या तिघांच्याही हत्येत एकाच शस्त्राचं वापर करण्यात आलं आहे, अशी माहिती एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिली. लंकेश, पानसरे, कलबुर्गींच्या हत्येत एकाच शस्त्राचा वापर वाघमारे याने गौरी लंकेश यांना गोळी मारली. तसेच, याच शस्त्राने गोविंद पानसरे आणि एम एम कलबुर्गी यांचीही हत्या करण्यात आली. तिन्ही हत्यांसाठी ज्या गोळ्या झाडण्यात आल्या, त्या गोळ्यांच्या मागील बाजूस एकसारख्याच खुणा आढळल्या, अशी माहिती एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. लंकेश, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येत वापरण्यात आलेले हे शस्त्र मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उजव्या विचारसरणीसाठी काम करणारा एक गट कार्यरत आहे. या गटानेच लंकेश, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या केल्या. सुजीतकुमार उर्फ प्रवीण या गटासाठी भरती करायचा. या गटात किमान 60 जण कार्यरत आहेत, अशी माहिती एसआयटीच्या अधिकाऱ्याने दिली. तसेच, या निनावी गटातील अनेकजण हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेशी संबंधित आहेत. मात्र सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीच्या सदस्यांचा सहभाग असला, तरी या दोन संस्थांचा या हत्यांशी थेट संबंध आहे का, याबाबत अजूनतरी पुरावे हाती लागलेले नाहीत, असेही एसआयटीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. गौरी लंकेश यांची हत्या 5 सप्टेंबर 2017 रोजी गौरी लंकेश यांची त्यांच्याच घराबाहेर हत्या झाली होती. त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यापैकी 3 गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या, तर एक गोळी त्यांच्या कपाळावर लागली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. बंगळुरुतल्या राजराजेश्वरीनगर परिसरात मंगळवार 5 सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर संपूर्ण देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व साहित्यिकांनीही याचा तीव्र शब्दात निषेध केला होता. कोण होत्या गौरी लंकेश ? गौरी लंकेश ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. गौरी यांच्याविरोधात गेल्यावर्षी मानहानीच्या दोन केसही दाखल करण्यात आल्या होत्या. धारवाडमधील भाजप खासदार प्रल्हाद जोशी आणि भाजप नेते उमेश दोषी यांनी गौरी लंकेश यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा आरोप केला होता. 2008 मध्ये छापलेल्या लेखात मानहानी केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने त्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र त्यांची जामिनावर मुक्तता झाली. 2015 मध्ये ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांचीही धारवाडमध्ये राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या या दुसऱ्या हत्याकांडाने राज्यात खळबळ माजली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
Abhijeet Dipke : राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 
हिशोब चुकता केला जाणार! एकाही देशद्रोह्याला सोडले जाणार नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं
हिशोब चुकता केला जाणार! एकाही देशद्रोह्याला सोडले जाणार नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget