एक हल्ला झाल्यावर अख्खी गाझापट्टी बॉम्ब टाकून बेचिराख करणाऱ्या इस्रायलची पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पहिली प्रतिक्रिया, म्हणाला भारताला...
Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर काल (22 एप्रिल) भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत.

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (22 एप्रिल) दुपारी झालेल्या हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण यात जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर जगभरातील राजदूत, नेत्यांकडून भारताला सहानुभूती दाखवत असून या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहेत. (Pahalgam Terror Attack) दरम्यान, एक हल्ला झाल्यावर अख्खी गाझापट्टी बॉम्ब टाकून बेचिराख करणाऱ्या इस्रायलची पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या हल्ल्यावर इस्रायलच्या राजदूतांनी दहशतवाद्यांबद्दल स्पष्टच वक्तव्य केलंय. इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी हा हल्ला भ्याड असल्याचे म्हटले आहे. (Reuven Azar)
आपल्याला घाबरवण्यासाठी आणि धमकवण्यासाठी दहशतवादी नेहमीच नवीन मार्ग शोधतात. अशा परिस्थितीत दहशतवादी कसा विचार करतात, कसे कार्य करतात हे समजून घ्यावे लागेल. या परिस्थितीला कसे तोंड द्यावे भारत सरकार ठरवेल. असेही ते म्हणाले. ते म्हणाले, मला खात्री आहे आपण अधिक जोरदारपणे लढू. भारत सरकारला चांगलेच माहित आहे. आम्ही त्यांच्यासोबत सहकार्य करण्यासाठी तयार आहेात असंही रुवेन अझर म्हणाले.
#WATCH | Delhi | On Pahalgam terror attack, Ambassador of Israel to India, Reuven Azar says, "...We always have copycats. The criminals always try to find out new ways to intimidate us...We will be more determined and we will invest more in fighting this phenomenon...We (India… pic.twitter.com/CL5mPweh18
— ANI (@ANI) April 23, 2025
इस्रायलची पहलगाम हल्ल्यावर पहिली प्रतिक्रीया
राजदूत अझर म्हणाले की, दहशतवादाचा सामना कसा करायचा हे भारताला सांगणे आमचे काम नाही. भारताकडे खूप चांगली बुद्धिमत्ता आहे. अशा परिस्थितीत, या परिस्थितीला कसे तोंड द्यावे. भारताला हे चांगलेच माहिती आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत सहकार्य करण्यास तयार आहोत. असेही ते म्हणाले. यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले होते की, पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्यामुळे मला दु:ख झाले आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्रायल भारतासोबत उभा आहे. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गेडीऑन सार यांनीही हल्ल्याचा निषेध केलाय.























