Operation Sindoor : भारताला अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या मरियम नवाज यांची जिरली; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकच्या पंजाबमध्ये आणीबाणी
Operation Sindoor Updates : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून रुग्णालयं आणि अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना कामावर तात्काळ हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली : आपल्याकडे अणुबॉम्ब आहेत, त्यामुळे भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याचं धाडस करणार नाही अशी काही दिवसांपूर्वी वल्गना करणाऱ्या मरियम नवाझ (Maryam Nawaz) यांची चांगलीच जिरली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवून पाकिस्तानच्या नऊ ठिकाणांना लक्ष्य केलं आणि अनेक दहशतवाद्यांना ठार केलं. त्यानंतर आता मरियम नवाझ यांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये आणीबाणी घोषित केली आहे. यावरून पाकिस्तानने भारतीय लष्कराचा किती मोठा धसका घेतला आहे याची प्रचीती येते.
मरियम नवाझ या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतांच्या मुख्यमंत्री (Punjab CM Maryam Nawaz) असून त्या माजी पंतप्रधान नवाझ शरिफ यांच्या कन्या (Nawaz Sharif Daughter) आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारताने त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हालचाल सुरू केल्यानंतर मरियम नवाझ यांनी एक वक्तव्य केलं होतं. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत, त्यामुळे भारत हल्ला करण्याचं धाडस करणार नाही असं त्या म्हणाल्या होत्या. पाकिस्तानी लष्कर त्याच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी समर्थ असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
अणुबॉम्बची वल्गना करणाऱ्यांची जिरली
भारताने पाकिस्तानच्या दहशतवादाला ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) माध्यमातून उत्तर दिल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे मरियम नवाझ यांनी पंजाब प्रांतामध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. या प्रांतातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणच्या विमानतळावरचे सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
पंजाब प्रांतातल्या पोलिस प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच रुग्णालयं आणि इतर अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांना तात्काळ कामावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाचा खात्मा
भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवून कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या (Masood Azhar) कुटुंबातील 14 जणांचा खात्मा करण्यात आला. या हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरचा भाऊ शतवादी भाऊ रौफ असगर गंभीर जखमी झाला. रौफ असगरचा मुलगा हुजैफाचाही यात समावेश आहे. तर अझहरचा भाऊ रौफ असगरच्या पत्नीचा यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात आणखी पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. रौफ असगर हा भारतातील मोस्ट मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे.
ही बातमी वाचा:























