एक्स्प्लोर
गौरी लंकेश हत्या प्रकरण : आणखी एकाला बेळगावातून अटक
गौरी लंकेश हत्ये प्रकरणात बेळगाव कनेक्शन वाढत चालले असल्यामुळे एसआयटीच्या देखील बेळगावच्या फेऱ्या वाढल्या आहेत.
बेळगाव : गौरी लंकेश हत्येप्रकरणी कर्नाटकाच्या एसआयटीने बेळगावातील एका संशयिताला अटक केले असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. महाद्वार रोडवरील संभाजी गल्ली येथील तो रहिवासी असून त्याच्या अटकेमुळे खळबळ उडाली आहे.
सध्या एसआयटीच्या ताब्यात असलेल्या व्यक्तीकडून या व्यक्तीचे नाव चौकशीत उघड झाले आहे. या व्यक्तीचे पुणे-बंगलोर महामार्गावर हॉटेल असून तेथे गौरी लंकेश प्रकरणातील संशयित जेवण करायला आणि चर्चा करायला जायचे. हॉटेल चालविणारा देखील हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहे. त्यामुळे काहीवेळा गौरी लंकेश प्रकरणातील व्यक्तींची राहण्याची सोय देखील याने केल्याचे समजते. एसआयटी पथक गेल्या दोन दिवसापासून त्याच्या मागावर होते म्हणून त्याने स्वतःहूनच शरणागती एसआयटी समोर पत्करली.
खानापूर तालुक्यात देखील अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे रिसॉर्ट होते, पण काही महिन्यापूर्वी ते बंद झाले आहे. परशुराम वाघमारे याने नेमबाजीचे प्रशिक्षण खानापूर जंगलात घेतल्याचे आपल्या जबाबात यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला घेऊन एसआयटी खानापूरला गेली होती. बेळगावजवळील एका गावातील आणखी एका परशुरामच्या शोधात एसआयटी आहे. पण अद्याप तो सापडला नाही. गौरी लंकेश हत्ये प्रकरणात बेळगाव कनेक्शन वाढत चालले असल्यामुळे एसआयटीच्या देखील बेळगावच्या फेऱ्या वाढल्या आहेत.
आपले हॉटेल असल्यामुळे येणाऱ्या ग्राहकांना आपण जेवण देतो, त्याप्रमाणेच गौरी लंकेश प्रकरणातील संशयितांना दिले. ओळख झाल्यामुळे राहण्याची सोय देखील केली. पण माझा कोणताही संबंध हत्या प्रकरणाशी नसल्याचे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने एसआयटीला सांगितले आहे. एसआयटीचे पथक अत्यंत गुप्तता राखून तपास करत असून अटक केलेल्या व्यक्तींना अज्ञात स्थळी नेऊन चौकशी करण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
राजकारण
राजकारण
Advertisement