28 October In History : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नूयी यांचा जन्मदिवस; आज इतिहासात
On This Day In History : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स (Bill Bates) यांचा आज जन्मदिवस आहे. याशिवाय आज पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी (PepsiCo CEO Indra nooyi) यांचा जन्मदिवस आहे.
मुंबई : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स (Bill Bates) यांचा आज जन्मदिवस आहे. 28 ऑक्टोबर 1955 रोजी वॉशिंग्टन येथे जन्मलेल्या बिल यांनी पॉल ऍलनसोबत 1975 मध्ये मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीची स्थापना केली. 1987 मध्ये फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत त्यांचे नाव आले आणि अनेक वर्षे ते या यादीत पहिल्या स्थानावर राहिले. भरपूर पैसा असूनही अत्यंत साधे आणि आरामदायी जीवन जगणारे बिल गेट्स आपल्या कमाईतील मोठा हिस्सा धर्मादाय कामे आणि सामाजिक सुधारणांवर खर्च करतात. त्यांनी द रोड अहेड आणि बिझनेस @ स्पीड ऑफ थॉट ही दोन पुस्तकेही लिहिली आहेत. याशिवाय आज पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी (pepsico ceo indra nooyi) यांचा जन्मदिवस आहे.
1867 : स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांचा जन्म
स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतासाठी समर्पित केले. 28 ऑक्टोबर 1867 रोजी जन्मलेल्या निवेदिता यांचे खरे नाव 'मार्गारेट एलिझाबेथ नोबल' होते. मार्गारेट या इंग्रजी-आयरिश समाजसेविका, लेखिका, शिक्षिका आणि स्वामी विवेकानंदांच्या शिष्या होत्या. वयाच्या 30 व्या वर्षी त्या भारतात आल्या. विवेकानंद मार्गारेटला भेटले त्यावेळी त्यांच्या हे लक्षात आले की मार्गारेट भारतीय महिलांच्या उन्नतीसाठी योगदान देऊ शकतात. मार्गारेटने लगेच मान्य केले की भारत ही तिची कामाची भूमी राहिल. तीन वर्षांनंतर जानेवारी 1898 मध्ये मार्गारेट भारतात आल्या. 25 मार्च 1898 रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना दीक्षा दिली आणि भगवान बुद्धांच्या करुणेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली.
1886 : स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेला समर्पित
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी फ्रान्सच्या जनतेकडून अमेरिकेला भेट म्हणून मिळालेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी राष्ट्राला समर्पित केला.
1914 : शास्त्रज्ञ जोनास एडवर्ड साल्क यांचा जन्म
जोनास साल्क हे अमेरिकन वैद्यकीय संशोधक आणि विषाणूशास्त्रज्ञ होते. त्यांनी पोलिओसाठी पहिली सुरक्षित आणि प्रभावी लस विकसित केली. जोनास यांचा जन्म न्यूयॉर्क शहरात झाला. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या वैद्यकीय शाळेत शिकत असताना त्यांनी डॉक्टर होण्याऐवजी वैद्यकीय संशोधनाकडे वाटचाल करून स्वत:साठी वेगळा मार्ग निवडला.
1955 : पेप्सिकोच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांचा जन्मदिवस
इंद्रा कृष्णमूर्ती नुयी यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1955 रोजी झाला. सध्या त्या पेप्सिको कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्या जगातील सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक आहे. याशिवाय त्या इंटरनॅशनल रेस्क्यू कमिटी, कॅटॅलिस्ट आणि लिंकन सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स बोर्डाच्या सदस्य आहेत. याबरोबरच सध्या त्या यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिलच्या अध्यक्षा म्हणून काम करतात.
1955 : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स यांचा जन्मदिवस
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स (Bill Bates) यांचा आज जन्मदिवस आहे. 28 ऑक्टोबर 1955 रोजी वॉशिंग्टन येथे जन्मलेल्या बिल यांनी पॉल ऍलनसोबत 1975 मध्ये मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीची स्थापना केली. 1987 मध्ये फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत त्यांचे नाव आले आणि अनेक वर्षे ते या यादीत पहिल्या स्थानावर राहिले. भरपूर पैसा असूनही अत्यंत साधे आणि आरामदायी जीवन जगणारे बिल गेट्स आपल्या कमाईतील मोठा हिस्सा धर्मादाय कामे आणि सामाजिक सुधारणांवर खर्च करतात. त्यांनी द रोड अहेड आणि बिझनेस @ स्पीड ऑफ थॉट ही दोन पुस्तकेही लिहिली आहेत.
196 2 : क्युबन क्षेपणास्त्र निष्क्रिय करण्याची घोषणा
आजच्या दिवशी म्हणजेच 27 ऑक्टोबर 1962 रोजी क्युबन क्षेपणास्त्र निष्क्रिय करण्याची घोषणा करण्यात आली. क्युबन क्षेपणास्त्र संकट दूर झाल्याने जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी रशियाने क्युबामध्ये तैनात असलेली क्षेपणास्त्रे निष्क्रिय करणार असल्याच्या घोषणेचे स्वागत केले.
1971 : ग्रेट ब्रिटनने प्रॉस्पेरो लाँच केले
ग्रेट ब्रिटनने 28 ऑक्टोबर 1971 रोजी प्रॉस्पेरो लाँच केले. X-3 उपग्रह मालिकेतील हा पहिला उपग्रह होता.
2009 : पाकिस्तानातील पेशावर शहरात आत्मघातकी बॉम्बस्फोट
पाकिस्तानातील पेशावर शहरात 28 ऑक्कोबर 2009 रोजी आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. या आत्मघातकी बॉम्बस्फोटात जवळपास 117 ठार लोक झाले होते. तर 213 जण जखमी झाले होते.
2012 : सीरियात शस्त्रसंधीचे उल्लंघन, 128 जणांचा मृत्यू
सीरियात शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याने यात 128 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच मोठ्या प्रमाणात लोक बेघर झाले आहेत.