23 राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव, 9 राज्यांची धाकधूक वाढली, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
Omicron Threat : ओमायक्रॉन व्हेरियंटने जवळपास सर्व भारतालाच विळखा घातला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 23 राज्यात सध्या 1711 रुग्ण झाले आहेत.
Omicron Threat : दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. जगभरात ओमायक्रॉन रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतातही ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटने जवळपास सर्व भारतालाच विळखा घातला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 23 राज्यात सध्या 1711 रुग्ण झाले आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, केरळ या राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटचा सर्वाधिक प्रसार होत आहे. 9 राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशामध्ये अद्याप ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार झालेला नाही. यामध्ये झारखंड आणि छत्तीसगढ यासारख्या मोठ्या राज्यांचा समावेश आहे. मनिपूरमध्ये ओमायक्रॉनचा फक्त एक रुग्ण आढळला आहे. पण जगभरातील ओमायक्रॉनचा प्रसार पाहाता पुढील काही दिवसांत प्रत्येक राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
भारतातील ओमायक्रॉन संसर्गाविषयी महत्वाचे दहा मुद्दे...
1 ) झारखंड आणि छत्तीसगढसारख्या मोठ्या राज्यात अद्याप एकही ओमायक्रॉनचा रुग्ण आढळलेला नाही. सध्या छत्तीसगढमध्ये सध्या कोरोनाचा 1273 सक्रीय रुग्ण आहेत. तर झारखंडमध्ये 1842 रुग्ण आहेत. मागील 24 तासांत छत्तीसगढमध्ये कोरोना विषाणूमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर झारखंडमध्ये फक्त दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
2) आसाम, मिझोराम, मेघालाय, नागालँड, सिक्किम, त्रिपुरा आणि अरुणचलप्रदेश या राज्यात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही.
3) आसाममध्ये कोरोनाचे 2321 सक्रीय रुग्ण आहेत. तर मिझोराम 1,732 आणि मणिपूरमध्ये 215 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. मणिपूरमध्ये फक्त एक ओमायक्रॉन रुग्ण आहे. मागील 24 तासांत मणिपूरमध्ये कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत आसाम आणि मिझोराममध्ये कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मेघालयमध्ये 75 सक्रिय रुग्ण आहेत. तर नागलँडमध्ये 60, सिक्कम 58 आणि त्रिपुरामध्ये 119 कोरोना रुग्ण आहेत. अरुणाचलप्रदेशमध्ये 16 कोरोनाचे रुग्ण आहेत.
4) दादरा नगर हवेली, दमन दीव, लक्षदीप आणि पुडुचेरी या केंद्रशासीत प्रदेशात एकही ओमाायक्रॉनचा रुग्ण नाही
5) महाराष्ट्र, दिल्ली आणि केरळमध्ये देशात सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीमध्ये 351 ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत. महाराष्ट्रात 510 ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत.
6) केंद्र शासीत प्रदेशामध्ये चंदीगढमध्ये रविवारी दोन ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. अंदमान-निकोबारमध्ये दोन कर लडाखमध्ये एक नवीन रुग्ण आढळला आहे. ust one case.
7) गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, राज्यस्थान, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत होते. या राज्यात रविवारी ओमायक्रॉनच्या एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.
8) रविवारी महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या 50 रुग्णाची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 510 इतकी झाली आहे. यामधील 328 ओमायक्रॉनचे रुग्ण मुंबईतील आहेत. तर 110 रुग्ण पुण्यात आढळले आहेत.
9) महाराष्ट्रानंतर रविवारी केरळमध्ये सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. रविवारी केरळमध्ये ओमायक्रॉनचे 45 रुग्ण आढळले होते. त्यामुळे केरळमधील एकूण ओमायक्रॉनच्या रग्णाची संख्या 152 इतकी झाली आहे. केरळचे आरोग्यमंत्र्यानी राज्यात ओमायक्रॉनचा समुह संसर्ग झाला नसल्याचे सांगितलं.
10) ओडिसामध्ये रविवारी ओमायक्रॉन रुग्णाचा स्फोट झाला. दिवसभरात ओडिसामध्ये 23 नव्या ओमायक्रॉनच्या रुग्णाची भर पडली. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 37 इतकी झाली.