एक्स्प्लोर

आजपासून रेल्वे तिकिटापासून ऑनलाइन पेमेन्टपर्यंत होणार 'हे' मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

रेल्वे प्रवासापासून पेन्शन गुंतवणुकीपर्यंत, डिजिटल पेमेंटपासून ऑनलाईन गेमिंगपर्यंत अनेक क्षेत्रात हे नियम लागू होणार आहेत.

Rules Change From 1st October: नवीन महिना म्हणजे अनेक नवे नियम, नवे बदल आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार. यंदा ऑक्टोबर महिना सुरू होताच तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक नियम बदलणार आहेत. (1st October) हे बदल फक्त तांत्रिक किंवा कागदी स्वरूपाचे नाहीत, तर त्यांचा थेट परिणाम घरगुती बजेट, खरेदी-विक्री, प्रवास, व्यवहार आणि अगदी मनोरंजनाच्या पद्धतींवर होणार आहे. रेल्वे प्रवासापासून पेन्शन गुंतवणुकीपर्यंत, डिजिटल पेमेंटपासून ऑनलाईन गेमिंगपर्यंत अनेक क्षेत्रात हे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून सुरू होणारे नवे बदल काय आहेत, ते एक एक करून जाणून घेऊयात.

रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये बदल

आतापर्यंत, एजंट आणि दलाल IRCTC तिकीट बुकिंगच्या पहिल्या काही मिनिटांत मोठ्या प्रमाणात तिकिटे बुक होते. यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट मिळत नव्हते. पण आता 1 ऑक्टोबरपासून, IRCTC वरून तिकीट बुक करताना सुरूवातीचे 15 मिनिटे आता एजंट तिकीट बुक करू शकणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट मिळेल.

पेन्शन योजनेत बदल

नॅशनल पेन्शन सिस्टीम (एनपीएस) मध्ये एक नवीन मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क लागू केले जाईल. यामुळे बिगर सरकारी क्षेत्रातील कर्मचारी, कॉर्पोरेट व्यावसायिक आणि गिग कामगार एकाच पॅन नंबरचा वापर करून अनेक पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या सोयी आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम पर्याय निवडता येईल.

डिजिटल पेमेंटमध्ये बदल

आता सर्वच जण UPI (Google Pay, PhonePe, Paytm) वापरून डिजिटल पेमेंट करतात. आता, NPCI ने एक मोठा बदल केला आहे. १ ऑक्टोबरपासून NPCI ने UPI चे "रिक्वेस्ट फॉर मनी" फीचर बंद करण्याचा निर्णय घेतलाय... या फीचरचा वापर कोणीही तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट पाठवण्यासाठी करू शकतो. याचा अनेकदा फसवणूक आणि फिशिंगसाठी गैरवापर केला जात असे. आता ते बंद झाल्यामुळे, डिजिटल व्यवहार आणखी सुरक्षित होतील. गुगल पे आणि फोनपे सारख्या अ‍ॅप्सद्वारे पैसे मागण्यासाठी ही सुविधा आता उपलब्ध राहणार नाही.

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

ऑनलाईन गेमिंगमध्ये बदल

ऑनलाइन गेमिंग क्षेत्र वेगाने वाढत आहे. परंतु त्यासोबत फसवणुकीच्या घटनाही घडत आहेत. सरकारने मंजूर केलेले नवीन नियम १ ऑक्टोबरपासून लागू होतील. गेमिंग कंपन्यांवर सरकारकडून कडक नजर ठेवली जाईल. खेळाडूंना सुरक्षित वातावरण आणि पारदर्शक प्रणाली मिळेल. फसवणूक आणि बनावट अॅप्सवर बंदी घातली जाईल. यामुळे गेमिंग उद्योगाचे नियमन होईल आणि खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल.

About the author सलमान शेख

सलमान शेख, हे 'एबीपी माझा' डिजीटलमध्ये व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून काम करतात. ते विविध विषयांवर व्हिडिओची निर्मिती करतात. त्यात 'कामाची गोष्ट With ABP माझा' ही सिरीझ लोकप्रिय आहे. यात ते दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी सोप्या भाषेत मांडतात. पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांना 4 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. याआधी त्यांनी टाईम्स नाऊ मराठी, दिव्य मराठीमध्ये काम केले आहे. राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आवड असून 'खोटं प्रॉमिस' या कादंबरीचे लेखक आहेत. 'उघड्यावरची भाकर' ही त्यांची कांदबरी लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget