एक्स्प्लोर
ऑनलाईन रेल्वे तिकिटावर 30 जूनपर्यंत सर्विस टॅक्स नाही!
मुंबई: रेल्वेचं तिकीट ऑनलाईन बुक करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बूक केल्यास 30 जूनपर्यंत सर्विस टॅक्स लागणार नाही. डिजिटल व्यवहाराला चालना मिळावी यासाठी सरकारनं ऑनलाईन ट्रेन बुकींगला सर्विस टॅक्समधून सूट दिली दिली आहे.
नोटाबंदीनंतर 23 नोव्हेंबर 2016 पासून 31 मार्च 2017 पर्यंत ऑनलाईन तिकीट बुकींगच्या सर्विस टॅक्समध्ये सूट देण्यात आली होती. आता ही सूट 30 जून 2017पर्यंत असणार आहे.
ऑनलाईन तिकीट बूक केल्यास 20 ते 40 रुपये सर्विस टॅक्ससाठी द्यावे लागत होते. मात्र, आता 30 जूनपर्यंत सर्विस टॅक्समधून प्रवाशांना सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना बराच दिलासा मिळाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement