एक्स्प्लोर
Advertisement
कोल्डड्रिंक्स आता MRP नुसारच, मनमानी कूलिंग चार्जेसला चाप
मुंबई : रेल्वे स्टेशन, हॉटेल, फूड मॉल अशा सर्व ठिकाणी आता शीतपेयं छापील किमतीनुसारच विकावी लागणार आहेत. कूलिंग चार्जेसच्या नावाखाली एक ते दोन रुपये वाढीव आकारले जाण्याच्या मनमानीला आता चाप बसणार आहे.
वैधमापन विभागानं यासंदर्भातला निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी कूलिंग चार्जेसच्या नावाखाली विक्रेत्यांकडून एक किंवा दोन रुपये वाढीव आकारले जातात. मात्र असं करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश वैधमापन शास्त्र विभागाच्या संचालकांनी देशातील सर्व राज्यांतील आपल्या विभागाला देण्यात आले आहेत.
रेल्वे स्टेशन, हॉटेल, फूड मॉल, ढाबा, मल्टिप्लेक्स, विमानतळं अशा सर्वच ठिकाणी हा नियम लागू होईल. शीतपेयांबरोबरच पाण्याची बाटली आणि खाद्यपदार्थांनाही हा नियम लागू करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
व्यापार-उद्योग
मुंबई
Advertisement