एक्स्प्लोर
नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक ओबीसी चेहरे
भाजपच्या साथीने बिहारमध्ये बहुमत सिद्ध करणाऱ्या नितीश कुमार यांच्या मंत्र्यांचा आज (शनिवार) पाटण्यात शपथविधी झाला.
पाटणा : भाजपच्या साथीने बिहारमध्ये बहुमत सिद्ध करणाऱ्या नितीश कुमार यांच्या मंत्र्यांचा आज (शनिवार) पाटण्यात शपथविधी झाला. नितीश कुमार यांच्या कॅबिटनेटमधल्या एकूण 26 मंत्र्यांनी शपथविधी घेतला. मात्र भाजपचे बिहारमधील एक मोठे नेते मानले जाणारे मंगल पांडेय शपथविधीला आले नाहीत.
लालूप्रसाद यादव यांच्या मुलावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर नितीश कुमार यांनी युतीतून बाहेर पडत स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आणि भाजपच्या साथीने बिहारमध्ये नवीन सत्ता स्थापन केली.
नितीश सरकारमध्ये मंत्रिपदं देताना जातीय समिकरणांवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. मंत्रिमंडळात जेडीयूच्या 14 आणि भाजपच्या 11 आमदारांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. तर रामविलास पासवान यांच्या एलजेपीमध्ये त्यांचे बंधू पशुपती कुमार पारस यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वतःकडे गृहखातं ठेवलं आहे. तर उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्याकडे अर्थ, वाणिज्य, वन आणि माहिती आणि तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नितीश कुमार यांना 131 आमदारांचा पाठिंबा मिळाला तर 108 आमदारांनी त्यांच्याविरोधात मत केलं. बिहार विधानसभेत एकूण आमदारांची संख्या 243 आहे. त्यामुळे इथे बहुमताचा आकडा 122 आहे.
संबंधित बातमी : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून बहुमत सिद्ध!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement