एक्स्प्लोर

युतीत सडल्याची टीका आणि सामनाची भाषा अत्यंत चुकीची: गडकरी

गोवा: शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन असतानाही युतीमध्ये मतभेद होती. पण कधी एकमेकांवर हल्लाबोल केला नाही. पण सध्या शिवसेनेकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेबद्दल गडकरींनी उद्धव ठाकरेंना सुनावलं. 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत नितीन गडकरींनी आपलं मत व्यक्त केलं. '25 वर्ष युतीत आम्ही सडत राहिलो हे म्हणणं चुकीचं' 'युती करायची की नाही हा दोन्ही पक्षाचा निर्णय आहे. युती नसती तर 95 साली युतीचं सरकार आलं नसतं. काल उद्धव यांनी जे शब्द वापरले किंवा 'सामना'मधून जे शब्द वापरले जातात त्यामुळे दोन्ही पक्षातील अंतर वाढत आहे. 25 वर्ष युतीत आम्ही सडत राहिलो हे म्हणणं चुकीचं आहे.' असं गडकरींना शिवसेनेला सुनावलं. 'बाळासाहेबांविषयी अटलजींइतकाच आमच्या मनात आदर' 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत अटलबिहारी वाजपेयी यांच्या इतकाच आमच्या मनात आदर होता आणि राहिल. प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात तेव्हा ठरलं होतं. की, जेव्हा कधी आपल्याला वाटेल की आपली युती आता तोडायला हवी. त्यावेळी आपण दोघं एकत्र बसूयात चहा पिऊयात आणि आनंदाच्या वातावरणात निरोप घेऊयात.' असंही गडकरींनी सांगितलं. 'युती झाली नाही याचं मला दु:ख आहे.' 'मला असं वाटतं की, शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता येता कामा नये. त्यामुळे दोन्ही पक्षांनी असे शब्द वापरावे की, ज्यामुळे ही कटुता कमी होईल. कारण देशातील सर्वाधिक चाललेली ही युती होती. एका विचाराच्या आधारावर ही युती झाली होती. परंतु आता ही युती झाली नाही याचं मला दु:ख आहे.' असं गडकरी म्हणाले. 'दोन्ही पक्षातील नेत्यांनी कटुता येणार नाही असे शब्द वापरावे' '25 वर्ष आम्ही गुणागोविंदानं राहिलो. आम्ही बाळासाहेबांना आमचेच नेते मानायचो. त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी शब्द जपून वापरावेत. बाळासाहेब आणि प्रमोदजी असताना अनेकदा वाद झाले पण त्यातून आम्ही मार्गही काढले.' असं म्हणत गडकरींनी नेत्यांना शब्द जपून वापरण्याचा सल्ला दिला. 'महाराष्ट्रातील नेतृत्व सरकार चालविण्यासाठी सक्षम आहे' 'मुंबई पालिका निवडणुकीमुळे युती तोडण्याचा निर्णय झाला. पण महाराष्ट्रातील नेतृत्व आणि मुख्यमंत्री हे राज्यातील सरकार चालविण्यासाठी सक्षम आहेत. योग्य वेळी ते योग्य तो निर्णय घेतील.' असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केलं. VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!
Sharad Pawar: ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
Crime News: लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
भाजपकडून अफवा पसरवण्याचं काम सुरु, रॅलीमुळं व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही, नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?  
भाजपकडून अफवा पसरवण्याचं काम सुरु, रॅलीमुळं व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही, नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?  

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
Dharashiv Drought: दुष्काळामुळे ताटातली भाकरी गायब होण्याच्या मार्गावर; यंदा शेतात ज्वारी खुरटली, पेरणीही घटली
दुष्काळामुळे ताटातली भाकरी गायब होण्याच्या मार्गावर; यंदा शेतात ज्वारी खुरटली, पेरणीही घटली
Mumbai Lift Death: खेळताना अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला अन्.., मुंबईतील 11 वर्षीय झैनच्या मृत्यूप्रकरणी तीन महिन्यानंतर कारवाई
खेळताना अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला अन्.., मुंबईतील 11 वर्षीय झैनच्या मृत्यूप्रकरणी तीन महिन्यानंतर कारवाई
Raj Thackeray Grandson And Amit Thackeray Daughter Name: राज ठाकरेंची नात आणि अमित ठाकरेंच्या मुलीचं नाव ठरलं; पुन्हा नावाची जोरदार चर्चा
राज ठाकरेंची नात आणि अमित ठाकरेंच्या मुलीचं नाव ठरलं; पुन्हा नावाची जोरदार चर्चा
Tukaram Mundhe Pune News : लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले,
लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले, "फराळात आर्टिफिशियल कलर अजिबात चालणार नाही..."
Sharad Pawar: ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
Pune Crime News: लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं

Embed widget