Nirmala Sitharaman Hospitalised : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल, अचानक प्रकृती खालावली
Finance Minister Nirmala Sitharaman in Hospital : केंद्रीय अर्थमंत्री (Minister of Finance of India) निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) रुग्णालयात यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Nirmala Sitharaman Hospitalised : केंद्रीय अर्थमंत्री (Minister of Finance of India) निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) रुग्णालयात यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सीतारामण यांची तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. सीतारामण यांना सोमवारी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्स रुग्णालयात (AIIMs) दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यांना दुपारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निर्मला सीतारामण यांना खासगी वार्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
अचानक प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर त्यांना तात्काळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांना एम्समधील खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयाकडून अधिकृत माहिती येणं बाकी
मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला सीतारमण या रुटीन चेकअपसाठी एम्स रुग्णालयाकडे निघाल्या होत्या. त्यावेळी अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, सीतारामणा यांच्या तब्येतीबाबत अद्याप अधिक माहिती मिळालेली नाही. त्यांच्यावर कोणत्या आजारसंदर्भात उपचार सुरु आहेत, याबाबत रुग्णालयाकडून अधिकृत माहिती समोर येणं बाकी आहे.
Union Finance Minister Nirmala Sitharaman admitted to AIIMS Delhi for a routine check-up: Official sources
— ANI (@ANI) December 26, 2022
(file photo) pic.twitter.com/8Lsa809rpx
अर्थमंत्री सीतारमण 2023 मध्ये अर्थसंकल्प सादर करतील
निर्मला सीतारमण या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. सीतारमण यांचं वय 63 वर्ष आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण पुढील वर्षी 2023 मध्ये अर्थसंकल्प सादर करतील.
याआधीही सीतारमण यांची तब्येत बिघडली होती. 2020 मध्ये त्यांनी सर्वाधिक वेळ अर्थसंकल्पीय भाषण देऊन विक्रम केला होता. त्यावेळी त्यांनी 160 मिनिटे भाषण केलं होतं. हे भाषण संपताना त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांना बोलण्याता अडचण येत होती.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण
निर्मला सीतारामण यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 रोजी मदुराई, तामिळनाडू येथे झाला. सीतारामण त्यांचे वडील नारायण सीतारामण हे रेल्वेत कर्मचारी होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिरुचिरापल्ली येथील सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. त्यांनी जेएनयूमधून अर्थशास्त्रात एमए आणि नंतर एमफिलची पदवी मिळवली आहे.
महत्वाच्या बातम्या :