एक्स्प्लोर
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या ऐवजी लवकरच नव्या आयोगाची स्थापना
नवी दिल्ली : मोदी सरकारने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग रद्द करण्याच्या तयारीत असून, त्याऐवजी नवा आयोग स्थापन करणार आहे. राष्ट्रीय सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आयोग असं या नव्या आयोगाचं नाव असणार आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याचं समजतं आहे.
या निर्णयामुळे 1993 सालापासून कार्यरत असलेल्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची मान्यता रद्द होऊन त्या जागी हा नवा आयोग स्थापन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या आयोगाला घटनात्मक दर्जा दिला जाणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय जाट समाजाच्या आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर घेतला जात असल्याची चर्चा आहे.
नव्या आयोगाची वैशिष्ट्ये काय असतील?
- या नव्या आयोगाला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाप्रमाणे घटनात्मक मान्यता असेल.
- यासाठी घटनेच्या कलम 338 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी संसदेत घटना दुरुस्ती विधेयक आणले जाईल.
- मागील आयोगाची रचना एखाद्या कायद्याप्रमाणे होती. त्यामुळे त्याला केवळ कायदेशीर मान्यता होती.
- सध्या अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये समाविष्ठ असलेल्या जातींच्या यादीत काही बदल करण्यासाठी अजूनही संसदेची परवानगी घ्यावी लागते.
- विशेष म्हणजे, ओबीसी समाजाच्या तक्रारींचे निवारण करण्याचा अधिकार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे होता. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे हा अधिकार नव्हता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
पुणे
Advertisement