एक्स्प्लोर
हैदराबादमध्ये 2000 च्या बनावट नोटा जप्त, 6 जण अटकेत
हैदराबाद : तेलंगाणाच्या हैदराबादमध्ये दोन हजारच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसंच 20, 50 आणि 100 रुपयांच्याही दोन लाखांपेक्षा जास्त नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
हैदराबादेतील राचाकोंडामध्ये पोलिसांच्या विशेष पथकाच्या धडक कारवाईमध्ये नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसंच याप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 2 लाख खोट्या नोटांसह 50 हजार खऱ्या नोटाही पथकानं ताब्यात घेतल्या आहेत. तसंच 2 स्कॅनर आणि बनावट नोटा बनवण्याचं साहित्य हस्तगत करण्यात आलं आहे.
जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांची छपाई खऱ्या नोटांसारखी नसली तरीही अद्याप बऱ्याच लोकांना नव्या पाचशे आणि हजारच्या नोटा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांची बनावट नोटांच्या माध्यमातून फसवणूक होऊ शकते. दरम्यान नव्या पाचशे आणि दोन हजारांची बनावट नोटा बनवणं अशक्य असल्याचंही बोललं जात होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement