"शेवटच्या क्षणी देता येणार नाही," NEET-PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सु्प्रीम कोर्टाने फेटाळली
NEET PG Exam 2024: पाच विद्यार्थ्यांमुळे दोन लाख विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आणू शकत नाहीत, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
NEET PG Exam 2024: नीट पीजी (Neet PG) परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) फेटाळली आहे. लाखो विद्यार्थ्यांना परीक्षेला बसावे लागते त्यामुळं असा आदेश शेवटच्या क्षणी देता नसल्याच्या सूचना कोर्टाने दिल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे अशा शहरांमध्ये आहेत जिथे पोहोचणे कठीण आहे अस म्हणत ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.
नीट पेपरफुटी प्रकरणी देशभर गदारोळ माजला असून या गैरव्यवहाराचे धागेदोरे अनेक जिल्ह्यात आढळले. त्यामुळे पेपरफुटीसह अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उमेदवारांना केंद्रांचे वाटप करण्यात आले होते. मात्र वेळेच्या कमतरतेमुळे उमेदवारांना विशिष्ट शहरांमध्ये जाण्याची व्यवस्था करणे कठीण जात असल्याचे याचिकेत म्हटले आहे. NEET UG परीक्षा यापूर्वी 23 जून रोजी होणार होती. परंतु स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून ती पुढे ढकलण्यात आली होती.
"At the behest of 5 petitioners, we can't put the career of 2 lakh students at jeopardy. Let there be certainty," CJI said
— Live Law (@LiveLawIndia) August 9, 2024
Read more: https://t.co/h7n4PnyTMI#SupremeCourt #NEETPG pic.twitter.com/ctXEG1Nkjj
नीट प्रकरणी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आजा सुनावणी पार पडली. या सुनावणीत सु्प्रीम कोर्टाने म्हटले की, पाच विद्यार्थ्यांमुळे दोन लाख विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आणू शकत नाहीत. यावर याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील संजय हेगडे म्हणाले की, हा पाच नाही 50 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे.
याचिकेत म्हटले आहे की, दोन लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. ही परीक्षा 185 शहरांमध्ये घेतली जाणार आहे, त्यामुळे रेल्वेची तिकिटे मिळणार नाहीत आणि विमानाचे भाडेही वाढणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात संख्येमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचणे जवळजवळ अशक्य आहे. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, पारदर्शकतेचा अभाव आणि दुर्गम परीक्षा केंद्रांमुळे उद्भवणारी आव्हाने अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान करू शकतात.
हे ही वाचा :