एक्स्प्लोर
Advertisement
बिगर भाजप शासीत राज्यांची सर्वोच्च न्यायालयात UGC-NEET परीक्षा पुढे ढकलण्यासाठी फेरविचार याचिका
बिगर भाजप शासीत 6 राज्य सरकारांनी सर्वोच्च न्यायालयात UGC-NEET परीक्षा पुढे ढकलण्यासाठी फेरविचार याचिका दाखल केली आहे. कोरोना संसर्ग परिस्थितीमुळे या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काँग्रेससह विरोधी पक्षांनी केलीय.
नवी दिल्ली : बिगर भाजप शासीत 6 राज्य सरकारांनी सर्वोच्च न्यायालयात UGC-NEET परीक्षा पुढे ढकलण्यासाठी फेरविचार याचिका दाखल केली आहे. कोरोना संकटात जेईईची परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर व नीटची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र, देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष करत आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसने संपूर्ण देशात सोशल मीडियावर आंदोलनं देखील केलं.
ही फेरविचार याचिका पश्चिम बंगाल (मोलोय घटक), झारखंड (रामेश्वर ओरावण), राजस्थान (रघु शर्मा), छत्तीसगड (अमरजीत भगत), पंजाब (बी एस सिद्धू) आणि महाराष्ट्र (उदय रविंद्र सावंत) या मंत्र्यांनी दाखल केली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात बिगर भाजप शासीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता, की या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी राज्ये एकमताने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतील.
Exclusive | जगात कुठल्याही नामांकित विद्यापीठानं परीक्षेशिवाय पदवी दिली नाही : UGC उपाध्यक्ष
काँग्रेसचे देशभर आंदोलन
जेईई मुख्य परीक्षांना अवघा आठवडा बाकी असून एनईईटी परीक्षेसाठी पंधरा दिवस बाकी आहेत. देशभरातील विद्यार्थी आणि पालकांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेसने या विरोधात देशभर आंदोलन सुरु केलं आहे. दिल्लीत काँग्रेसच्या अनेक नेत्यांना, कार्यकर्त्यांसह ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कुमार यांचाही समावेश आहे.
काँग्रेसची सोशल मीडियावर मोहिम
कोरोना संकटात जेईईची परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर व नीटची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसने संपूर्ण देशात आज सोशल मीडियावर आंदोलनं केलं. #SpeakUpForStudentSafety अंतर्गत देशभर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी या परीक्षेविरोधात आपली मतं सोशल मीडियावर मांडली. मुंबईत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी आंदोलनात भाग घेतला. केंद्र सरकारने राज्य सरकारची, विद्यार्थ्यांची भूमिका ऐकून घेतली पाहिजे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा नको अशी भूमिका त्यांनी मांडली.
NEET JEE Exams 2020 | नीट-जेईई स्थगितीसाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement