एक्स्प्लोर
अयोध्येत राम मंदिर होईल, उद्धव ठाकरेंना विश्वास
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सहकुटुंब अयोध्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व 18 खासदारांसह रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर उद्ध ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अयोध्येत राम मंदिर होणारच असा विश्वास व्यक्त केला.

लखनौ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सहकुटुंब अयोध्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व 18 खासदारांसह रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर उद्ध ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अयोध्येत राम मंदिर होणारच असा विश्वास व्यक्त केला.
उद्ध ठाकरे म्हणाले की, मी गेल्या वर्षी अयोध्येत आलो होतो. तेव्हा पुढील वर्षी पुन्हा येईन असे आश्वासन दिले होते. आज मी माझे आश्वासन पूर्ण केले आहे. ठाकरे यांनी एनडीए सरकार लवकरच अयोध्येत राम मंदिर बांधेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकर म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी मोदी सरकारने अध्यादेश काढावा. भारतीय जनता पक्षाकडे बहुमत आहे. तसेच आम्ही एनडीएतील सर्व पक्ष त्यांच्यासोबत आहोतच. आपल्याकडे खूप मोठी ताकद आहे. त्यामुळे अध्यादेश आणून आपण राम मंदिर बांधू.
दरम्यान, आज सकाळी 9 च्या सुमारास उद्धव ठाकरे अयोध्येतील फैजाबाद विमानतळावर उतरले. उद्धव यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे 18 खासदार कालच (शनिवारी) अयोध्येमध्ये दाखल झाले होते. 10 वाजता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व 18 खासदारांसह रामलल्लाचे दर्शन घेतले.
उद्धव ठाकरेंनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येचा दौरा केला होता. निवडणुकीनंतर पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करु, असे आश्वासनही त्यांनी त्यावेळी दिले होते. त्याच आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी उद्धव यांनी आज अयोध्येचा दौरा केला.
दरम्यान, निवडणुकीपूर्वी केलेल्या अयोध्या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांनी 'पहले मंदिर, फिर सरकार' असा नारा दिला होता. भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत आले आहे. परंतु मंदिराच्या कामाला अद्याप सुरुवातदेखील झालेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
