Supriya Sule : सुप्रिया सुळेंना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार, महाराष्ट्रातील 'हे' चार खासदार संसदरत्न
सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. यावेळी देशातल्या 11 खासदारांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. चेन्नईच्या प्राईम पॉईंट फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. यावेळी देशातल्या 11 खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या चार खासदारांचा यात समावेश आहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे (shrirang barane), राष्ट्रवादीच्या फौजिया खान (fauzia khan) , भाजपच्या हीना गावित (heena gavit)यांना देखील संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. कामगिरीतल्या सातत्याबद्दल सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांना "संसद विशिष्ट रत्न' पुरस्कार असणार आहे.
चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा संसदरत्न 2022 हा पुरस्कार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजप खासदार हिना गावित आणि राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांना देण्यात येत असल्याची माहिती फाउंडेशनच्या वतीने जाहिर करण्यात आली आहे.
अकरा जणांना पुरस्कार जाहीर
यंदा एकूण 11 जणांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. यंदा ज्या अकरा जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे यामधे महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश आहे तर रिव्हॉलुशनरी सोशलिस्ट पक्षाचे खासदार एन. के. प्रेमचंद्रन तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय, काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा आणि भाजपचे खासदार विद्युत बरान महातो, सुधीर गुप्ता राज्यसभेतील बिजू जनता दलाचे खासदार अमर पटनायक, कम्युनिट पार्टीचे खासदार के. के. रागेश यांचा देखील समावेश आहे.
संबंधित बातम्या:
- ST Strike: एसटी संपावर पुढील सुनावणी शुक्रवारी; कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचं राज्य सरकारचे आवाहन
- संपामुळे झालेले नुकसान कामगारांकडून वसूल करण्याचा कोणताही निर्णय नाही : एसटी महामंडळ
- ST Strike: एसटी विलिनीकरणावर अद्याप निर्णय नाही, धोरणात्मक निर्णय असल्याने वेळ लागेल; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती