एक्स्प्लोर
Advertisement
नौदलाचं ड्रोन विमान कोच्चीच्या समुद्रात कोसळलं
कोच्ची : भारतीय नौदलाचं ड्रोन विमान काल (बुधवारी) संध्याकाळी कोच्चीजवळ समुद्रात कोसळलं. रिमोटवर चालणारं हे ड्रोन विमान हेरगिरी आणि किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी वापरलं जातं. मात्र नेहमीच्या एका मोहीमेवर असताना हे विमान काल समुद्रात कोसळलं.
नौदलाचं हे विशेष ड्रोन विमान सलग 4 तास आकाशात घिरट्या घालू शकतं. तसेच 1000 किमीचा अंतरावरील निरीक्षणही करु शकतं. या ड्रोनच्या शोधासाठी नौदलाची शोधमोहीम सुरु केली आहे. शिवाय यासाठी विशेष उपकरणं घेऊन खलाशीही शोधकार्यात सहभागी झाले आहेत.
हवाईदलाचं विमान बेपत्ता होऊन आठवडा उलटण्याआधीच ही घटना घडल्याने बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान याप्रकरणी नौदलाने विशेष चौकशी समिती नेमली असून युद्धपातळीवर या ड्रोनचा शोध घेतला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
मुंबई
निवडणूक
Advertisement