एक्स्प्लोर
वाढदिवसाला प्रशिक्षकाकडून बलात्कार, राष्ट्रीय नेमबाजाचा आरोप
नवी दिल्ली : प्रशिक्षकाने लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार एका राष्ट्रीय स्तरावरील महिला नेमबाजाने केली आहे. दिल्लीतील चाणक्यपुरी पोलिस स्टेशनमध्ये संबंधित प्रशिक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला खेळाडू गेल्या दोन वर्षांपासून तिच्या प्रशिक्षकाकडे नेमबाजीचं प्रशिक्षण घेत असून 'साई' म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणामध्ये राष्ट्रीय चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी करत आहे.
या काळातच दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. प्रशिक्षकाने पीडित खेळाडूला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केलं, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
प्रशिक्षकाने नुकतीच वाढदिवसाच्या निमित्ताने महिला खेळाडूच्या घरी भेट दिली. या वेळी त्याने मद्यपानाचा आग्रह करत त्यामध्ये गुंगीचं औषध मिसळलं आणि लैंगिक शोषण केलं, असंही तक्रारीत म्हटलं आहे.
मात्र आपण लग्न करण्याबाबत कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं, असा दावा प्रशिक्षकाने केल्याचं महिला खेळाडूने तक्रारीत म्हटलं आहे. तसंच घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तिने केला. त्यानंतर महिला खेळाडूने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान संबंधित प्रशिक्षक सध्या फरार असून त्याचा फोनही बंद आहे. प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार विजेता आहे. त्याने भारताचं अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रतिनिधित्व केलं असल्याची माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement