Red Wine Benefits : आज आहे 'रेड वाईन डे', रेड वाईनचे जितके फायदे तितकेच तोटे, वाचा सविस्तर...
National Red Wine Day 2022 : आज राष्ट्रीय रेड वाईन दिवस (National Red Wine Day) आहे. वाईनची विविधता साजरी करण्याचा हा दिवस आहे. लाल रंगाचं हे पेय अनेक जणांच्या पसंतीस उतरलेलं आहे.
National Red Wine Day 2022 : आज 'राष्ट्रीय रेड वाईन दिवस' (National Red Wine Day) आहे. आजकाल अनेक जण वाईन पिण्याचे शौकीन असल्याचं दिसून येतं. लाल रंगाचं हे पेय अनेक जणांच्या पसंतीस उतरलेलं आहे. आज हे पेय पिण्याचा खास मौका आहे, कारण आज रेड वाईन डे आहे. वाईनची विविधता साजरी करण्याचा हा दिवस आहे. जर तुम्ही रेड वाईन पिण्याचे शौकीन असाल आज तुमच्याकडे खास दिवस साजरा करण्याची संधी आहे. रेड वाईन आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. रेड वाईन पिणं हृदयासाठी फायदेशीर असतं. रेड वाईनचं सेवन केवळ हृदयासाठीच नाही तर त्वचेसाठीही गुणकारी ठरतं. रेड वाईनचं सेवन मर्यादित प्रमाणात केलं तर हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरतं.
रेड वाईन काय आहे?
रेड वाईन द्राक्षांपासून तयार करण्यात येणार एक पेय आहे. रेड वाईन काळ्या रंगाच्या द्राक्षांपासून बनविली जाते. यासाठी काळ्या रंगाची द्राक्षं सालीसह आंबवली जातात. रेड वाईनमधील पॉलिफेनॉल हे अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठी फायदेशीर आहेत. रेड वाईनमध्ये प्रामुख्याने रेझवेराट्रोल नावाचे पॉलिफेनॉल असते, हे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. याशिवाय, रेड वाईन वाईच कोलेस्ट्रॉलमुळे कमी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, रेड वाईन रक्तवाहिन्यांना जोडणाऱ्या पेशींचे कार्य सुधारण्यास देखील मदत करते. रेड वाईनमध्ये भरपूर प्रमाणात लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन सी असते.
रेड वाईन किती प्रकारची असते?
रेड वाईन गडद द्राक्षांपासून बनविली जाते, परंतु वाइनचा रंग बदलू शकतो. या वाईनचा रंग लाल, जांभळा, किंवा वाइनचा रंग तपकिरी असू शकतो. सामान्यतः वापरल्या जाणार्या वाइन दोन प्रमुख लाल द्राक्षाच्या जातींपासून बनवल्या जातात, कोट्सिफली (Kotsifly) आणि मांडिलारी (Mandilari) अशा या दोन द्राक्षांच्या जाती आहेत. कोट्सिफली द्राक्षांपासून बनवलेल्या वाइनचा रंग हलका असतो, परंतु त्यात अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं. मांडिलारी द्राक्षांपासून तयार केलेली रेड वाईन गडद लाल रंगाची असते. परंतु त्यात अल्कोहोलचं कमी असतं. रेड वाईनचे सिराह (Syrah), मर्लोट (Merlot), कॅबारनेट सॉविनन (Cabernet), माल्बॅक (Malbec), पिनॉट नोयर (Pinot noir), जिनफॅडेल (Zinfandel), संगियोवॅस (Sangiovese), बारबेरा (Barbera) हे प्रकार आहेत.
वाईनचा इतिहास
वाइन हे एक पारंपारिक युरोपियन पेय आहे, परंतु आता जगाच्या इतर भागांत देखील वाईन उद्योगाचं मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. वाईनचा इतिहास फार जुना आहे. प्राचीन ग्रीकांनीच सुमारे 800 ईसापूर्व वाइन तयार केली. मध्ययुगातही वाईनची भूमिका मोठी होती. 1300-1500 च्या सुमारास युरोप अनेक संकटांशी झुंज देत होता. त्यावेळी लोकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नव्हता, यामुळे लोक पाण्यापेक्षा जास्त वाईन प्यायचे. यामध्ये प्रौढांसह लहान मुलांचाही समावेश होता. आर्मेनियामध्ये इ.वि.पू सुमारे 4100 काळातील सर्वात जुनी वायनरी सापडली आहे. जुन्या काळात वाईन ही देवाणघेवाण साठीची महत्त्वाची वस्तू होती. जगभरात विशेषत: यूएस, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेत अनेक प्रकारचे वाइन तयार केले जातात.
रेड वाईन पिण्याचे फायदे
1. कर्करोगाचा धोका कमी होतो
रेड वाईनचे नियमित आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यानं अंडाशय, प्रोस्टेट, बेसल सेल, कोलन, कार्सिनोमा इत्यादी विविध प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी होतो. त्यामुळे तुम्ही नॅशनल वाईन डे साजरा करत असताना ते वाईन पिण्याचा आनंद घेऊ शकता.
2. रेड वाईनमुळे वजन नियंत्रित राहते
रेड वाईनमध्ये आढळणारे रेझवेराट्रॉल हे पिसॅटॅनॉलमध्ये रूपांतरित होते, ज्यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
3. पचनसंस्थेसाठी लाभदायक
पोटाची जळजळ आणि इतर पचनक्रियेसंबंधित आजारांवर रेड वाईनचे अँटी-बॅक्टेरियल गुण फायदेशीप ठरतात.
रेड वाईन पिण्याचे तोटे
दरम्यान, रेड वाईन जास्त प्रमाणात प्यायल्यास त्याचे आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात रेड वाईन पिल्याने हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. जर तुम्ही नॅशनल रेड वाईन डे साठी रेड वाईन पिण्याचा विचार करत असाल तर, प्रत्येक प्रकारच्या वाइनचे फायदे आणि दुष्परिणामांबाबत जागरूक असणं आवश्यक आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )