(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम 31 जानेवारीपासून सुरू होणार, यासंदर्भातील प्रत्येक माहिती जाणून घ्या
31 जानेवारीपासून देशात राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम सुरू केली जाईल. 30 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती भवनात काही मुलांना पोलिओ थेंब देऊन मोहिमेची सुरुवात करतील. ही मोहीम 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
नवी दिल्ली : कोविड -19 विरुद्ध देशभरात सर्वात मोठी लसीकरण मोहीम आयोजित केली जात आहे. कोरोना लसीकरण दरम्यान, 31 जानेवारीपासून देशात राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे. यापूर्वी याची सुरूवात 17 जानेवारीपासून होणार होती. परंतु, 16 जानेवारीपासून कोविड -19 लसीकरण मोहीम सुरू झाल्यामुळे याला स्थगिती देण्यात आली होती.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राष्ट्रीय पोलिओ लसीकरण दिनी 30 जानेवारीला सकाळी 11.30 वाजता राष्ट्रपती भवनात काही मुलांना पोलिओ थेंब देऊन या मोहिमेची सुरूवात करणार आहेत. पोलिओ मोहिमेशी संबंधित काही तथ्य आहेत जे सर्वांना माहित असणे आवश्यक आहे.
ही मोहीम 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार या मोहिमेअंतर्गत 5 वर्षांपर्यंतच्या मुलांना पोलिओ थेंब देण्यात येणार असून ही मोहीम 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पोलिओ निर्मुलनाच्या पुढाकारानंतर 1995 मध्ये पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम सुरू झाला. पोलिओ लसीकरण मोहीम ज्या रविवारी सुरु झाली त्याला राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून ओळखले जाते.
ज्येष्ठ नागरिकांना मुलांसोबत जाण्याचा सल्ला पोलिओ लसीकरण मोहीम वर्षातून दोनदा घेतली जाते आणि सहसा सुरुवातीच्या काही महिन्यांत सुरू केली जाते. सध्या कोविड 19 साथीच्या आजारात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना मुलांना लसीकरण शिबिरात घेऊन न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोविड -19 लसीकरण तीन दिवस थांबव्याची शक्यता कोविड -19 लसीकरण मोहीम सुरू करण्यापूर्वी, आरोग्य मंत्रालयाने सध्या चालू असलेल्या टीकाकरण कार्यक्रमाशी कोणतीही तडजोड केली जाऊ नये, असा आग्रह धरला. दरम्यान, कोविड -19 लसीकरणाच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी पोलिओ लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार पोलिओ लसीकरण मोहिमेच्या तीन दिवसांत कोविड -19 लसीकरण अभियान थांबवण्याची शक्यता आहे.