(Source: ECI/ABP News/ABP Majha)
National Broadcasting Day 2023 : आज 'राष्ट्रीय प्रसारण दिन'; या निमित्ताने वाचा या दिनाचा मनोरंजक इतिहास आणि महत्त्व
National Broadcasting Day 2023 : आकाशवाणीची 23 जुलै 1927 रोजी स्थापना झाली. 1927 साली याच दिवशी, देशातील सर्वप्रथम प्रथम रेडिओ प्रसारण बॉम्बे स्टेशन वरून भारतीय प्रसारण कंपनी मार्फत करण्यात आले.
National Broadcasting Day 2023 : बातम्यांचे आणि मनोरंजनाचे एक सोपे माध्यम म्हणून भारतीयांच्या आयुष्यात रेडिओचे असलेले महत्त्व साजरे करण्यासाठी दरवर्षी 23 जुलै रोजी राष्ट्रीय प्रसारण दिन आयोजित केला जातो. आकाशवाणीची 23 जुलै 1927 रोजी स्थापना झाली. 1927 साली याच दिवशी, देशातील सर्वप्रथम प्रथम रेडिओ प्रसारण बॉम्बे स्टेशनवरून भारतीय प्रसारण कंपनी मार्फत करण्यात आले. यामुळे हा दिवस 'प्रसारण दिन' म्हणून साजरा केला जातो. 1 एप्रिल 1930 रोजी सरकारने ही खासगी प्रसारण कंपनी ताब्यात घेऊन त्याचे नामकरण भारतीय राज्य प्रसारण सेवा (आयएसबीएस) असे केले. त्यानंतर, 8 जून, 1936 रोजी याचे रुपांतर अखिल भारतीय रेडिओ (ऑल इंडिया रेडियो) मध्ये करण्यात आले. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्यानुसार आज ही आकाशवाणी अतिशय जोमाने वाटचाल करत आहे.
इंग्रज सरकारने बी.बी.सीच्या धर्तीवर भारतात ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ स्थापना करून 23 जुलै 1927 रोजी पहिल्यांदा मुंबई आणि कोलकता येथे आकाशवाणीचे प्रसारण सुरू झाले. ‘प्रसारण दिन’ म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जेव्हा 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ‘ऑल इंडिया रेडिओ’ नावाचा स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली. ‘ऑल इंडिया रेडिओ’चे अधिकृतरीत्या 1936 साली ‘आकाशवाणी’ हे नाव ठरविण्यात आले होते.
राष्ट्रीय प्रसारण दिनाचा इतिहास
1926 मध्ये ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ ह्या एका खाजगी कंपनीने भारत सरकारशी एक करार करून मुंबई आणि कलकत्ता येथे अनुक्रमे 23 जुलै आणि 26 ऑगस्ट 1927 रोजी दोन रेडिओ-केंद्रे सुरू केली. या केंद्रांची कार्यक्रम 48 किमी. च्या परिसरातच ऐकू येण्याची व्यवस्था होती. या सुमारास देशात 1000 रेडिओ-परवाने होते. 1927 च्याही अगोदर भारतात नभोवाणीचा प्रसार खाजगी हौशी क्लबांद्वारा झालेला होता. 1924 मध्ये मद्रास येथे पहिला रेडिओ-क्लब स्थापन झाला. हौशी रेडिओ-क्लब लाहोर, अलाहाबाद, पेशावर, आणि डेहराडून येथे चालविले जात होते. सरकारने भावी काळात स्थापिलेल्या रेडिओ-केंद्रांचे हे रेडिओ-क्लब अग्रदूत ठरले. म्हैसूर, बडोदा, त्रिवेंद्रम, हैदराबाद आणि औरंगाबाद ह्या पाचही ठिकाणी नभोवाणी-कार्य चालू होते. म्हैसूर संस्थानाने 1935 मध्ये स्थापिलेल्या रेडिओ-केंद्रास ‘आकाशवाणी’ हे नाव दिले होते. हेच नाव पुढे भारत सरकारने देशातील सर्व रेडिओ-केंद्रांसाठी स्वीकारले.
तब्बल 27 भाषांमध्ये प्रसारण
भारताबाहेरील देशांसाठीचा आकाशवाणीचा सेवा विभाग एकंदर 27 भाषांमध्ये प्रसारण करतो. हे प्रसारण मुख्यतः लघुतरंगांच्या माध्यमातून बाहेरील देशांमध्ये केले जाते. ’सामान्य बाह्य प्रसारण सेवा’ ही इंग्रजीमध्ये 8 तास सेवा देणारी प्रमुख सेवा आहे.
महत्त्वाच्या बातम्या :