एक्स्प्लोर
सरकारची नव्हे, देशाची इमेज महत्त्वाची : मोदी
नवी दिल्ली : स्वातंत्र दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. सकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केलं.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्दे
अगणित महापुरुषांचा स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष,त्यामुळे आपण आज मोकळा श्वास घेतोय:मोदी
सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाला एक केलं, आता आपल्याला देश श्रेष्ठ बनवायचाय : मोदी
पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, राजधानी दिल्लीत तगडी सुरक्षा व्यवस्था
भीमपासून भीमरावरपर्यंत भारताचा इतिहास, देशाचा इतिहास हजारो वर्ष जुना आणि समृद्ध : मोदी
उपनिषद ते उपग्रह, महाभारतातला भीम ते भीमराव, सुदर्शन चक्रधारी मोहन ते चरखा चक्रधारी मोहन हा भारताचा इतिहास आहे- पंतप्रधान मोदी
स्वराज्याला सुराज्यामध्ये परिवर्तन करण्याचा देशवासियांचा संकल्प
एक काळ होता जेव्हा देशातली सरकारं आरोपांनी घेरलेलं असायची, पण आमचं सरकार अपेक्षांनी घेरलेलं आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
एक काळ होता जेव्हा सरकार आरोपांनी घेरलं होतं,पण आमचं सरकार अपेक्षांनी घेरलेलं आहे:
आमच्या 2 वर्षाच्या कार्यकाळात जनतेची अगणित कामं झाली
२ वर्षात सरकारनं एवढी असंख्य कामं केलीयत, की त्याचा पाढा वाचायचा म्हटलं तर लाल किल्ल्यावरुन मला आठवडाभर बोलत बसावं लागेल- पंतप्रधान मोदी
आज एक मिनिटात 15 हजार रेल्वे तिकीट मिळणं शक्य झालं आहे : मोदी
देशात लाखो अडचणी आहेत, पण त्यावर उपाय शोधणारी सव्वाशे कोटी जनता आहे : मोदी
आता आठवडाभरात पासपोर्ट मिळतो,2015-16 या वर्षात आम्ही पावणे दोन कोटी पासपोर्ट दिले:मोदी
आधी दिवसाला ७० ते ७५ किमीचे रस्ते बनत होते, आमच्या सरकारमध्ये दिवसाला १०० किमी रस्ते बनतायत- लाल किल्ल्यावरुन मोदी
क आणि ड वर्गातल्या तब्बल ९ हजार सरकारी पदांसाठी मुलाखतीची पद्धत रद्द केलीय, थेट भरतीमुळे पारदर्शकता- पंतप्रधान मोदी
आधी दिवसाला 70 ते 75 किमीचे रस्ते बनत होते, आमच्या सरकारमध्ये दिवसाला 100 किमी रस्ते बनत आहेत : मोदी
9 हजार पदांसाठी मुलाखत न घेता तरुणांसाठी नोकरीची संधी : मोदी
कायद्याचं जंजाळ लोकांसाठी अडचणीचं ठरतंय, आम्ही त्यात सुसुत्रीकरण करतोय, कायदे कालसुसंगत बनवतोय : मोदी
कमी वेळात देशातील गावात 2 कोटीहून अधिक शौचालयं बनली आहेत : मोदी
देशातील 18 हजार गावांपैकी 10 हजार गावात वीज पोहोचल्याचं सांगताना अतिशय आनंद होतोय:मोदी
60 वर्षात केवळ 14 कोटी गॅस कनेक्शन, तर 60 आठवड्यात 4 कोटी नवे एलपीजी गॅस कनेक्शन: मोदी
प्रत्येकाने आपल्या घरात एलईडी बल्ब लावून विजेची बचत करावी
आधीच्या सरकारच्या काळात महागाईचा दर 10 टक्क्यांवर होता, मात्र आम्ही हा दर 6 टक्क्यांवर जाऊ दिला नाही : मोदी
आमच्या सरकारने महागाई नियंत्रित केल्याने गरिबांना दिलासा मिळाला : मोदी
डाळीचं उत्पादन वाढवून दर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न : मोदी
शेतकऱ्याला पाणी मिळालं तर तो मातीतून सोनं उगवेल, जलसिंचन योजनेचा आवाका वाढवणार : मोदी
यंदा डाळबियांची पेरणी दीड पट करण्यात आलीय, त्यामुळे डाळीच्या महागाईचं संकट नष्ट होईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी
आधीच्या सरकारने आपली ओळख बनवण्याचा प्रयत्न केला,पण सरकारपेक्षा भारताची ओळख बनवणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे:मोदी
आधीच्या सरकारच्या उणिवा दूर करुन आम्ही पुढे जात आहोत : मोदी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement