Narendra Modi : 'कितीही दबाव आला तरी आपण आपली ताकद वाढवायची' ट्रम्प यांच्या टॅरिफवर नरेंद्र मोदींचं उत्तर
PM Modi on Trump Tariff: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकरी आणि पशुपालकांचं हित महत्त्वाचं आहे, असं म्हटलं. देशातील व्यावसायिकांनी विदेशी वस्तूंची विक्री करु नये, असं म्हटलं.

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये खोडलधाम मैदानात 5400 कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. यावेळी सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प टॅरिफवर मोठं वक्तव्य केलं आहे. आज जगात सर्वजण आर्थिक स्वार्थाचं राजकारण, सर्व काही आमचं असं करू लागलेत, आम्ही हे काळजीपूर्वक पाहतोय, असं मोदी म्हणाले.
कितीही दबाव आला तरी आम्ही आमची ताकद वाढवणार
नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकरी आणि पशुपालकांचं हित आमच्यासाठी सर्वात वर आहे. ते म्हणाले की मी आपल्या लघू उद्योगांना, छोट्या दुकानदार, शेतकरी, पशुपालकांना बोलेन, मी गांधींच्या धरतीवरुन बोलत आहे. माझ्या देशाचे छोटे उद्योजक, शेतकरी आमि पशुपालक असो, मोदीसांठी त्यांचं हित सर्वांच्या वर आहे. माझं सरकार छोटे उद्योजक, शेतकरी, पशुपालकांच्या हिताच्या विरोधात निर्णय होऊ देणार नाही. दबाव कितीही आला तरी तो सहन करण्याची आमची ताकद वाढवणार, असं मोदी म्हणाले.
विदेशी वस्तूंचा वापर करु नका
नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांना म्हटलं की भारतात बनलेल्या वस्तूंना प्राधान्य द्यावं, सजावटीचं साहित्य असो या भेटवस्तू आपल्याला देशात बनलेल्या साहित्य, वस्तूची खरेदी करावी. भारतीय उद्योजकांनी विदेशी वस्तू विकण्यापासून दूर राहावं, असं म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आमचं सरकार जीएसटीमध्ये रिफॉर्म करत आहे. दिवाळीपूर्वी तुम्हाला मोठी भेट मिळेल. जीएसटी रिफॉर्ममुळं लघु उद्योगांना मोठी मदत मिळेल. अनेक वस्तूंवरील कर कमी होईल. यामुळं दिवाळीत व्यापारी असो की सामान्य व्यक्तींना दिलासा मिळेल, आनंदाचा बोनस मिळेल, असं मोदी म्हणाले.
जगानं पाहिलं भारतानं कसा बदला घेतला
नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत म्हटलं की जगानं पाहिलं भारतानं पहलागम दहशतवादी हल्ल्याचा कसा बदला घेतला. 22 मिनिटात काम पूर्ण, ऑपरेशन सिंदूरनं आमच्या सैन्याचं शौर्य पाहिलं. यापूर्वी ते आपलं रक्त सांडायचे आणि दिल्लीत बसलेलं काँग्रेस सरकार काही करत नव्हतं. मात्र, आम्ही आज दहशतवाद्यांना आणि त्यांच्या प्रमुखांना आम्ही सोडत नाही, ते कुठेही लपलेले असले तरी, असं मोदी म्हणाले.























