एक्स्प्लोर
Advertisement
नारायण राणे भाजपची खासदारकीची ऑफर मान्य करतील?
नारायण राणे यांना भाजपकडून राज्यात नव्हे तर दिल्लीत पाठवण्याची तयारी सुरु झाली आहे.
नवी दिल्ली : नारायण राणे यांना भाजपकडून राज्यात नव्हे तर दिल्लीत पाठवण्याची तयारी सुरु झाली आहे. काल (बुधवार) रात्री भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या ११ अकबर रोड या दिल्लीतल्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यात जवळपास तासभर बैठक झाली.
या बैठकीला नितेश राणे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचीही उपस्थिती होती. येत्या २३ मार्चला महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभेतल्या संख्याबळानुसार भाजपला ३ उमेदवार राज्यसभेवर पाठवता येणार आहेत. त्यापैकी एक जागा राणेंना देऊन राणेंसारखं स्फोटक मिसाईल हे राज्याऐवजी दिल्लीतच पाठवण्याचा भाजपमध्ये प्रयत्न सुरु आहे.
राणेंची इच्छा राज्यातच राहण्याची अधिक असल्यानं त्यांना ही राज्यसभेची तडजोड पचनी पडणार का? असाही प्रश्न आहे. केंद्रात गेल्यावर राणेंना खासदारकीवरच समाधान मानावं लागणार आहे. काल भाजपच्या मुख्यमंत्र्यांची परिषद दिल्लीत होती. १९ राज्यातले मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री या बैठकीसाठी दिल्लीत आलेले होते. संध्याकाळी साडेदहा वाजता ही बैठक संपल्यानंतर भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्येच जवळपास १५ मिनिटे स्वतंत्र चर्चा झाली.
ही चर्चा करुन बाहेर आल्यावर अमित शाहंच्या गाडीत बसून दोघेही बाहेर पडले. त्यानंतर रात्री सव्वा अकराच्या सुमारास अमित शाहंच्या बंगल्यावर नवी खलबतं सुरु झाली. तिथे आधीच पोहचलेले नारायण राणे, नितेश राणे, भाजपचे आशिष शेलार हेदेखील नंतर यात सामील झाले. जवळपास तासभर ही खलबतं भाजपाध्यक्षांच्या बंगल्यावर सुरु होती.
राणेंनी काँग्रेसच्या विधानपरिषदेवरच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. मात्र, नितेश हे अजूनही काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांची थेट भाजपाध्यक्षांच्या बंगल्यावरची उपस्थिती आश्चर्यजनक होती. या भेटीत राणेंनी आपल्या पुत्राच्या भवितव्याचा विचारही मांडला. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राणेंना खासदारकी आणि नितेश राणेंना भविष्यात राज्यात काही स्थान असा प्रस्ताव दिला गेल्याची शक्यता आहे.
अमित शाहंच्या निवासस्थानावरची ही बैठक संपल्यावर काल मुख्यमंत्री फडणवीस, नारायण राणे, आशिष शेलार हे एकाच गाडीत बसून एअरपोर्टवर पोहचले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement