Namastey Trump LIVE UPDATES | प्रेमाचं प्रतीक ताजमहलला डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नीसह भेट
LIVE
Background
अहमदाबाद : भारत दौऱ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प सहकुटुंब रवाना झाले आहेत. वॉशिंग्टनमधल्या एअर बेसवरुन काल रात्री ट्रम्प यांच्या विमानानं उड्डाण घेतलं आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता डोनल्ड ट्रम्प अहमदाबादला पोहोचणार आहेत. हा दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते 22 किलोमीटर लांब रोड शो करणार आहेत आणि मोटेरा क्रिकेट स्टेडियममधील 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमात मोदींसोबत जनसभेला संयुक्तरित्या संबोधित करणार आहेत. याचसोबत डोनाल्ड ट्रम्प साबरमती आश्रमलाही भेट देणार आहेत.
Gujarat: Preparations underway at Motera Stadium underway at Motera Stadium in Ahmedabad, ahead of US President Donald Trump's visit tomorrow. The 'Namaste Trump' event will be held here at the stadium tomorrow. pic.twitter.com/znBrvnjbrX
— ANI (@ANI) February 23, 2020
डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इव्हांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनर देखील असणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज झालं आहे. विमानतळ ते मोटेरा स्टेडियम पर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी नमस्ते ट्रम्पचे बॅनर लावण्यात आले आहेत. ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. ट्रम्प यांचं आलिशान आणि शाही स्वागत होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा उद्या भारताकडे लागणार आहेत.
Namaste Trump | भारत दौऱ्यासाठी डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब रवाना; कसे असतील ट्रम्प यांचे देशातील 36 तास
मोदी आणि ट्रम्प यांचा रोड शो
अहमदाबाद विमानतळावर पोहोचल्यावर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं भव्य स्वागत केलं जाणार आहे. जिथे मोदी आणि ट्रम्प रोड शो करणार आहेत. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोड शोनंतर ट्रम्प आणि मोदी मोटेरा येथे असलेल्या मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये पोहोचणार आहेत. ट्रम्प यांच्या रोड शोला अहमदाबाद महानगरपालिकेने 'इंडिया रोड शो' असं नाव दिलं आहे. रोड शोमध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी जवळपास सर्व राज्यांमधून कलाकारांना आमंत्रण देण्यात आलं आहे. रोड शोनंतर मोदी आणि ट्रम्प 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमासाठी मोटेरा स्टेडियममध्ये पोहोचतील, जिथे ते लाखो लोकांना संबोधित करतील. मोटेरामध्ये उभारण्यात आलेलं क्रिकेट स्टेडियम जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. ज्यामध्ये एक लाख दहा हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे.
राष्ट्रपती ट्रम्प यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी भारतात जय्यत तयारी सुरू आहे. उद्या म्हणजेच, 24 फेब्रुवारीला जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येणार आहेत. उद्या भारतात अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प 11 किलोमीटर लांब रोड शो करणार आहेत. हा रोड शो खास करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. रोड शोसाठी रस्त्यामध्ये 28 स्वागत मंच तयार केले आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशातील लोक कलाकार आपल्या कला सादर करणार आहेत. तसेच अनेक विद्यार्थीदेखील या रोडशोसाठी उत्सुक आहेत.
Namaste Trump | ट्रम्प यांच्या स्वागतासाठी असलेला मोटेरा स्टेडियमजवळील गेट कोसळला
ट्रम्प यांच्यासोबत मुलगी आणि जावईदेखील भारत दौऱ्यावर
डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीसोबत आता मुलगी इवांका ट्रम्प आपल्या पतीसह भारत दौऱ्यावर येणार आहेत. इवांका ट्रम्पचा हा दुसरा भारत दौरा असणार आहे. याआधी इवांका 2017मध्ये हैदराबादमधील ग्लोबल बिजनेस समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे.
पाहा व्हिडीओ : डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी खास जेवणाची सोय, सोन्या-चांदीच्या ताटात जेवण
हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शहरात गस्त घालणार
ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे हेलीकॉप्टरमार्फत संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त असणार आहे. तसेच अमेरिकन स्नायपर्स, सीसीटिव्ही यांमार्फत नजर ठेवण्यात येणार आहे. एवढचं नाहीतर संपूर्ण शहरावर हेलिकॉप्टरच्या मदतीने नजर ठेवली जाणार आहे. अहमदाबादमध्ये 11 हजारपेक्षा अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प साबरमती नदीवर काही वेळ थांबणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
कसा असेल ट्रम्प यांचा भारत दौरा :
24 फेब्रुवारीचा कार्यक्रम
अमेरिकी राष्ट्रपतींसह त्यांचे कुटुंब 24 फेब्रुवारीला सकाळी 11.40 वाजता अहमदाबादमध्ये येणार आहेत.
पंतप्रधान नरेद्र मोदी त्यांना घेण्यासाठी अहमदाबाद एअरपोर्टला जाणार आहेत.
अहमदाबाद शहरात ट्रंप यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला आहे.
12.15 वाजता ते साबरमती आश्रमला भेट देणार आहे.
01.05 वाजता जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमचे ते उद्घाटन करतील आणि या भव्य कार्यक्रमानंतर ट्रम्प मोटेरा स्टेडियममध्ये लाखो जणांना संबोधित करतील.
03.30 वाजता अहमदाबाद येथील नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमानंतर ट्रम्प कुटुंब ताजमहल पाहण्यासाठी 24 फेब्रुवारी रोजी आगरा येथे दाखल होणार आहे.
4.45 वाजता आग्र्याला पोहोचतील.
05.15 वाजता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना ताजमहाल पाहण्यासाठी घेऊन जाणार आहे.
ताजमहलकडे जाणाऱ्या रस्त्यावर शालेय मुलं आणि दिल्लीकर ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उभी असतील... सोबतच ३ हजार कलाकार वाटेत नृत्यही सादर करणार आहेत. या कलाकारांना युपीहून आमंत्रित केलं आहे.
06.45 ला निघून 7.30 ला दिल्लीला पोहोचतील.
25 फेब्रुवारीचा कार्यक्रम
सकाळी 10.00 : ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवन येथे स्वागत
सकाळी .10.30 महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करतील
सकाळी 11.00 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा होईल.
दुपारी 12.40 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होतील त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद पार पडेल.
संध्याकाळी 7.30 वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींसह चर्चा पार पडेल
संबंधित बातम्या :
Namaste Trump | कार्यक्रम खासगी संस्थेचा, मग सरकारकडून कोट्यवधींचा खर्च का? : काँग्रेस
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा; भारतीय सैन्य दलही स्वागतासाठी सज्ज
India-US | भारत आणि अमेरिकेच्या अध्यक्ष भेटीचा इतिहास
डोनाल्ड ट्रम्प झाले 'बाहुबली फॅन'; शेअर केला 'हा' व्हिडीओ
'नमस्ते इवांका'; डोनाल्ड ट्रम्पसोबत इवांका ट्रम्पही येणार भारतात
Viral : जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातमध्ये, BCCI कडून एरियल व्ह्यू फोटो शेअर
डोनाल्ड ट्रम्प भारतात येण्याआधी अमेरिकी सीक्रेट सर्व्हिसचे एजंट दाखल; दौऱ्यासाठी करणार नियोजन