एक्स्प्लोर
Advertisement
Namaste Trump | भारत दौऱ्यासाठी डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब रवाना; कसे असतील ट्रम्प यांचे देशातील 36 तास
भारत दौऱ्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब रवाना झालेत. डोनाल्ड ट्रम्प हे 36 तासांसाठी भारत दौऱ्यावर येत आहेत. कसा असणार ट्रम्प यांचा भारत दौरा जाणून घ्या.
अहमदाबाद : जगातील महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी गुजरातमधील अहमदाबादमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. भारत दौऱ्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब रवाना झालेत. वॉशिंग्टनमधल्या एअर बेसवरुन ट्रम्प यांच्या विमानानं उड्डाण घेतलंय. उद्या सकाळी साडे अकरा वाजता डॉनल्ड ट्रम्प अहमदाबादला पोहोचणार आहेत.
हा दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया आणि मुलगी इव्हांका ट्रम्प देखील असणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज झालंय. विमानतळ ते मोटेरा स्टेडियम पर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी नमस्ते ट्रम्पचे बॅनर लावण्यात आले आहेत. ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत चोख बंदोबस्त लावण्यात आलाय. देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. ट्रम्प यांचं आलिशान आणि शाही स्वागत होणार आहे. त्यामुळे अख्ख्या जगाच्या नजरा उद्या भारताकडे लागणार आहेत.
Namaste Trump | ट्रम्प यांच्या स्वागतासाठी असलेला मोटेरा स्टेडियमजवळील गेट कोसळला
कसा असेल ट्रम्प यांचा भारत दौरा -
24 फेब्रुवारीचा कार्यक्रम
अमेरिकी राष्ट्रपतींसह त्यांचे कुटुंब 24 फेब्रुवारीला सकाळी 11.40 वाजता अहमदाबादमध्ये येणार आहेत
पंतप्रधान नरेद्र मोदी त्यांना घेण्यासाठी अहमदाबाद एअरपोर्टला जाणार आहेत
अहमदाबाद शहरात ट्रंप यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला आहे
12.15 वाजता ते साबरमती आश्रमला भेट देणार आहे
01.05 वाजता जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमचे ते उद्घाटन करतील आणि या भव्य कार्यक्रमानंतर ट्रम्प मोटेरा स्टेडियममध्ये लाखो जणांना संबोधित करतील
03.30 वाजता अहमदाबाद येथील नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमानंतर ट्रम्प कुटुंब ताजमहल पाहण्यासाठी 24 फेब्रुवारी रोजी आगरा येथे दाखल होणार आहे.
4.45 वाजता आग्र्याला पोहोचतील.
05.15 वाजता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना ताजमहाल पाहण्यासाठी घेऊन जाणार आहे.
ताजमहलकडे जाणाऱ्या रस्त्यावर शालेय मुलं आणि दिल्लीकर ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उभी असतील... सोबतच ३ हजार कलाकार वाटेत नृत्यही सादर करणार आहेत. या कलाकारांना युपीहून आमंत्रिक केलं गेलंय.
06.45 ला निघून 7.30 ला दिल्लीला पोहोचतील
डोनाल्ड ट्रम्प झाले 'बाहुबली फॅन'; शेअर केला 'हा' व्हिडीओ
आग्रा येथे माकडांचा उच्छाद हा सुरक्षायंत्रणांचा काळजीचा विषय ठरला आहे. ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांच्या आग्रा येथील मार्गावरील माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी चक्क पाच माकडांना (लंगूर) तैनात करण्यात आलं आहे. आग्रा परिसरात माकडांचा सुळसुळाट अधिक आहे. या माकडांना दूर ठेवण्यासाठी लंगूर (काळतोंडी वानरं) विशिष्ट अंतरावर ठेवले जातील.
25 फेब्रुवारीचा कार्यक्रम
सकाळी 10.00 : ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवन येथे स्वागत
सकाळी .10.30 महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करतील
सकाळी 11.00 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा होईल.
दुपारी 12.40 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होतील त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद पार पडेल.
संध्याकाळी 7.30 वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींसह चर्चा पार पडेल
Donald Trump India Visit | डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा कसा असणार? माझाचा विशेष रिपोर्ट | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement