MCD News : आता दिल्लीतील जनतेला कचऱ्याचा त्रास होणार नाही! MCD चे अॅप तुम्हाला 24 तास 'अशी' मदत करणार
MCD News : दिल्ली महानगरपालिकेने आपल्या स्वच्छतेशी संबंधित '311' अॅप सक्रिय केले आहे. याच्या मदतीने लोकांच्या कचऱ्याशी संबंधित समस्या संपुष्टात येणार आहेत.
MCD News : नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी दिल्ली महानगरपालिकेने (Municipal Corporation Delhi) मोठे पाऊल उचलले आहे. दिल्लीतील कचरा (Delhi Garbage) आणि स्वच्छतेशी संबंधित कोणत्याही तक्रारीबाबत, आता महापालिका एका कॉलमध्ये 24 तासांच्या आत त्याचे निराकरण करणार आहे. या संदर्भात दिल्ली महानगरपालिकेने आपले स्वच्छतेशी संबंधित अॅप '311' सक्रिय केले आहे, म्हणजेच दिल्लीत कुठेही कचरा किंवा घाण दिसल्यास '311' अॅपद्वारे तक्रार करता येईल. याशिवाय कचरा वेल्नेरेबल पॉइंटची तक्रार आल्यानंतर तो 14 दिवसांत हटवला जाईल. या अॅपशी संबंधित समस्यांचे दररोज निराकरण केले जाईल.
मेगा स्वच्छता मोहीम सुरू झाली
दिल्ली महानगरपालिकेने मेगा स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. 'अब दिल्ली होगी साफ' असे या मोहिमेचे नाव आहे. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत एमसीडीचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, आमदार दिल्लीतील लोकांसह प्रत्येक प्रभागाची स्वच्छता करण्यात गुंतले जातील. दिल्लीतील लोकांच्या तक्रारींसाठी MCD कडे '311' नावाचे अॅप आहे. या अॅपला भेट देऊन तुम्ही तुमच्या परिसरात स्वच्छतेबाबत काही तक्रार केल्यास ती त्वरित दुरुस्त केली जाईल.
'अशा' प्रकारे तुम्ही तक्रार करू शकता
दिल्लीच्या महापौर शैली ओबेरॉय यांनी आता दिल्ली स्वच्छ होईल या अॅपशी संबंधित आवश्यक माहिती देताना सांगितले की, लोक या अॅपवर कचरा, खड्डे, पथदिवे, उद्याने इत्यादींशी संबंधित समस्यांबाबत तक्रार करू शकतात. तक्रार करण्यासाठी, तुम्हाला त्या समस्येच्या फोटोवर क्लिक करावे लागेल आणि ते लोकेशनसह अॅपवर पाठवावे लागेल. तुमची समस्या 24 तासात सोडवली जाईल.
दिल्लीच्या सर्व डीसींना या अॅपशी संबंधित समस्यांचे दररोज निराकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीच्या सर्व 12 झोनच्या डीसींनी आपापल्या स्तरावर पाहणी करून त्याचा फोटो लोकेशनसह अॅपवर टाकावा. संवेदनशील कचरा पॉइंटच्या तक्रारी 2 आठवड्यांत सोडवल्या जातील. या अॅपमध्ये येणाऱ्या सर्व तक्रारींवर दिल्लीतील तिन्ही एजन्सी नजर ठेवतील.
महत्त्वाच्या बातम्या :