एक्स्प्लोर

विमानबंदी हटवली, तरी खा. रवींद्र गायकवाड ट्रेननेच रवाना

नवी दिल्ली : एअर इंडिया आणि इतर हवाई वाहतूक कंपन्यांनी बंदी हटवल्यानंतरही शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी ट्रेनलाच पसंती दिली आहे. खासदार रवींद्र गायकवाड हे दिल्लीहून राजधानी एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. जवळपास दोन आठवड्यांनी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानबंदी हटवण्यात आली. शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर एअर इंडियाने आपला निर्णय मागे घेतला. मात्र गायकवाड यांनी माफी माघावी अशी भूमिका एअर इंडियाने घेतली होती. पण मी संसदेची माफी मागेन, एअर इंडियाची नाही असं रवींद्र गायकवाड यांनी काल म्हटलं होतं. काय आहे प्रकरण? उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. बिझनेस क्लासचं तिकीट असताना आपल्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं, असा दावा गायकवाड यांनी केला. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला. विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे. ‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही,  मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो,  अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली. भारतीय विमान संघाची बंदी भारतीय विमान संघानं गायकवाडांवर बंदी घातली . जवळपास भारतातील सर्व विमान कंपन्यांनी गायकवाडांवर बंदी घातली . भारतीय विमान संघामध्ये गोएअर, जेट एअरवेज, जेटलाईट, इंडिगो यासारख्या प्रमुख विमान कंपन्यांचा समावेश आहे. कोण आहेत रवींद्र गायकवाड? – रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत – लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला. – उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचित आहेत – रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते. – दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे. – तसंच उस्मानाबाद परिसरातील वीजेच्या प्रश्नासाठीही आवाज उठवला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी 982 पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा पदके; 125 शौर्य पुरस्कार; जम्मू आणि काश्मीर पोलिसांना सर्वाधिक पदके, महाराष्ट्राला किती?
प्रजासत्ताक दिनी 982 पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा पदके; 125 शौर्य पुरस्कार; जम्मू आणि काश्मीर पोलिसांना सर्वाधिक पदके, महाराष्ट्राला किती?
शिंदेसेनेला पाठिंबा नाहीच, केडीएमसीतील नगरसेवकांना आदेश; मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितली रणनीती
शिंदेसेनेला पाठिंबा नाहीच, केडीएमसीतील नगरसेवकांना आदेश; मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितली रणनीती
Sanjay Raut: मला शिवसेना अन् ठाकरे कुटुंबाने लायकीपेक्षा जास्त दिलंय, बाळासाहेबांच्या कृपेमुळे इतकी वर्षे दिल्लीत: संजय राऊत
मला शिवसेना अन् ठाकरे कुटुंबाने लायकीपेक्षा जास्त दिलंय, बाळासाहेबांच्या कृपेमुळे इतकी वर्षे दिल्लीत: संजय राऊत
Donald Trump : भ्रमात राहू नका तुमच्यावर 100 टक्के टॅरिफ लादू, डोनाल्ड ट्रम्प यांची शेजारी देशाला धमकी, चीन कनेक्शनमुळं भडकले
भ्रमात राहू नका तुमच्यावर 100 टक्के टॅरिफ लादू, डोनाल्ड ट्रम्प यांची शेजारी देशाला धमकी, चीन कनेक्शनमुळं भडकले

व्हिडीओ

Padma Award 2026 : 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा, रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड, भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्म पुरस्कार जाहीर
Ajit Pawar Baramati : भर सभेत अजित पवार पदाधिकाऱ्यांवर भडकले
Malad Railway station : लोकलमधून उतरण्यावरून वाद, धारदार शस्त्राने प्राध्यापकाला संपवलं
Sanjay Raut on Eknath Shinde Shivsena : पुढच्या निवडणुकीत शिंदेंकडे धनुष्यबाण चिन्ह नसेल; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Special Report Greenland : ग्रीनलँडवर अमेरिकेची वक्रदृष्टी का? काय आहे ग्रीनलँडचा इतिहास?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी 982 पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा पदके; 125 शौर्य पुरस्कार; जम्मू आणि काश्मीर पोलिसांना सर्वाधिक पदके, महाराष्ट्राला किती?
प्रजासत्ताक दिनी 982 पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा पदके; 125 शौर्य पुरस्कार; जम्मू आणि काश्मीर पोलिसांना सर्वाधिक पदके, महाराष्ट्राला किती?
शिंदेसेनेला पाठिंबा नाहीच, केडीएमसीतील नगरसेवकांना आदेश; मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितली रणनीती
शिंदेसेनेला पाठिंबा नाहीच, केडीएमसीतील नगरसेवकांना आदेश; मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितली रणनीती
Sanjay Raut: मला शिवसेना अन् ठाकरे कुटुंबाने लायकीपेक्षा जास्त दिलंय, बाळासाहेबांच्या कृपेमुळे इतकी वर्षे दिल्लीत: संजय राऊत
मला शिवसेना अन् ठाकरे कुटुंबाने लायकीपेक्षा जास्त दिलंय, बाळासाहेबांच्या कृपेमुळे इतकी वर्षे दिल्लीत: संजय राऊत
Donald Trump : भ्रमात राहू नका तुमच्यावर 100 टक्के टॅरिफ लादू, डोनाल्ड ट्रम्प यांची शेजारी देशाला धमकी, चीन कनेक्शनमुळं भडकले
भ्रमात राहू नका तुमच्यावर 100 टक्के टॅरिफ लादू, डोनाल्ड ट्रम्प यांची शेजारी देशाला धमकी, चीन कनेक्शनमुळं भडकले
Kolhapur Zilla Parishad Election: गुलाबी साडी अन्! कोल्हापुरात जावळाच्या कार्यक्रमात पाच लाखांच्या साड्या; भरारी पथकाने पाठलाग करत टेम्पो पकडला, मतदारांना वाटण्यासाठी साड्या आणल्याचा संशय
गुलाबी साडी अन्! कोल्हापुरात जावळाच्या कार्यक्रमात पाच लाखांच्या साड्या; भरारी पथकाने पाठलाग करत टेम्पो पकडला, मतदारांना वाटण्यासाठी साड्या आणल्याचा संशय
Padma Award 2026: पद्म पुरस्कारांची घोषणा, देशातील 45 मान्यवरांचा सन्मान; महाराष्ट्रातील लोकनाट्य तमाशा अन् कृषी क्षेत्राला बहुमान
पद्म पुरस्कारांची घोषणा, देशातील 45 मान्यवरांचा सन्मान; महाराष्ट्रातील लोकनाट्य तमाशा अन् कृषी क्षेत्राला बहुमान
Kalyan Crime: कल्याणच्या दुर्गाडी चौकात तरुणांची ट्रॅफिक पोलिसाला मारहाण, शिंदे गटाशी कनेक्शन, नेमकं काय घडलं?
कल्याणच्या दुर्गाडी चौकात तरुणांची ट्रॅफिक पोलिसाला मारहाण, शिंदे गटाशी कनेक्शन, नेमकं काय घडलं?
बार्शीत दोन शिवसेना एकत्र, सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण; सोलापुरात जयकुमार गोरेंवरही घणाघाती टीका
बार्शीत दोन शिवसेना एकत्र, सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण; सोलापुरात जयकुमार गोरेंवरही घणाघाती टीका
Embed widget