एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
2 मिनिटात 2000 ची बनावट नोट तयार करणारं रॅकेट गजाआड
पोलिसांनी रविवारी याप्रकरणी चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 60 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
इंदूर : मध्य प्रदेशातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या इंदूरमध्ये दोन हजारच्या बनावट नोटा तयार करणारं रॅकेट पोलिसांनी पकडलं आहे. पोलिसांनी रविवारी याप्रकरणी चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 60 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
पोलिसांना या रॅकेटविषयी माहिती मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपींना गजाआड केलं. त्यांच्याकडून 2 लाख 60 हजार रुपये जप्त करण्यात आले. यामध्ये बनावट 500 आणि 2000 च्या नोटांचा समावेश आहे. दोन हजारची एक नोट दोन मिनिटात तयार केली जात असल्याचीही माहिती आहे.
हे रॅकेट इंदूरमधील पीथमपूर भागात कार्यरत होतं. आतापर्यंत 10 लाख नोटा छापल्याची आरोपींनी कबूली दिली आहे. शिवाय चार लाख रुपये सुरतमधील एका व्यापाऱ्याला दिल्याची माहितीही आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
या रॅकेटमधील एक जण अजून फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी बनावट नोटा छापण्याच्या साहित्यासहित स्कॅनर आणि प्रिंटर जप्त केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement