Morning Headlines 2nd August: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
बिहार जातनिहाय जणगणनेवरील बंदी कोर्टाने उठवली, पाटणा हायकोर्टाच्या निकालाने नितीशकुमार सरकारला बळ
बिहार सरकारला पाटणा उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. बिहार सरकारच्या जातनिहाय जनगणना आणि आर्थिक, सामाजिक सर्वेक्षणावरील बंदी पाटणा उच्च न्यायालयाने मंगळवारी उठवली आहे. बिहारमधील जातीनिहाय सर्वेक्षण वैध असल्याचा निकाल पाटणा उच्च न्यायालयाने दिला आहे. (वाचा सविस्तर)
मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस गोळीबार प्रकरण; चौथ्या मृताची ओळख पटली, अजमेर शरीफहून परतताना झाला गोळीबार
मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील चौथ्या मृतकाची ओळख पटली आहे.सय्यद सैफुदिन(43) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.तो हैदराबादच्या बाजारघाटचा रहिवासी आहे. मूळच्या कर्नाटक बिदरचे रहिवासी असलेला सैफुदिन हा गेल्या पंधरा वर्षापासून हैदराबादमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होता. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. (वाचा सविस्तर)
हिंसाचाराचा मणिपूरला फटका, जुलै महिन्यातील जीएसटी संकलनात 30 टक्क्यांची घट
मणिपूरमध्ये हिंसाचार भडकून तीन महिने झाले असून, राज्यातील हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. या हिंसाचारात 160 लोकांना आपला जीव गमवावा लागला असून हजारो लोक बेघर झाले आहेत. मणिपूरमधील हिंसाचाराचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या जुलै 2023 च्या जीएसटी संकलनाच्या आकडेवारीनुसार, मणिपूर या एकमेव राज्याचे जीएसटी संकलन घटले आहे. (वाचा सविस्तर)
Haryana Violence : गुरुग्राममध्ये मशिदीच्या इमामाची हत्या, VHP ची एनआयए चौकशीची मागणी, पलवलमध्ये 25 झोपड्यांना आग
हरियाणाच्या नूहमध्ये उसळलेला जातीय हिंसाचार गुरुग्रामपर्यंत पसरला आहे. या हिंसाचारात काल रात्री एका मशिदीच्या इमामाची हत्या करण्यात आली. याशिवाय एका भोजनालयाला आग लावण्यात आली आणि दुकानांची तोडफोड देखील करण्यात आली. (वाचा सविस्तर)
जुलै महिन्यात GST महसुलात 11 टक्क्यांची वाढ, सलग पाचव्या वेळेस GST संकलन 1.60 लाख कोटीच्या पुढे
जुलै महिन्यात जीएसटी महसुलात (GST collections) चांगली वाढ झाली आहे. जुलै महिन्यात 1,65,105 कोटी रुपयांचे GST संकलन झाले आहे. हे संकलन मागील वर्षीच्या म्हणजे जुलै 2022 च्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे देशांतर्गत व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाल्याचं चित्र समोर आलं आहे. (वाचा सविस्तर)
Income Tax Return : यंदाच्या वर्षी विक्रमी ITR दाखल, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 16 टक्के अधिक ITR चा भरणा
आयकर विवरण दाखल (Income Tax Return Filing) करण्याची मुदत सोमवारी, 31 जुलै 2023 रोजी संपली. यंदाच्या वर्षात आयकर विवरण दाखल करणाऱ्यांच्या संख्येत विक्रमाी वाढ झाली आहे. 31 जुलै 2023 पर्यंत एकूण 6.77 कोटी करदात्यांनी आयकर रिटर्न भरले आहेत. आयकर विभागाने ही माहिती दिली आहे. (वाचा सविस्तर)
बंगालच्या शेवटच्या नवाबाची ब्रिटिशांकडून कपटाने हत्या, फ्रान्सवर ताबा मिळवल्यानंतर हिटलरचा ब्रिटनवर हल्ला; आज इतिहासात
इतिहासात आजचा दिवस हा भारतासाठी काळा दिवस आहे. बंगालचा शेवटचा स्वतंत्र नवाब सिराज-उद-दौलाच्या (Siraj-Ud-Daulah) हत्येसह त्याच्या कारकिर्दीचा शेवट हा ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील राजवटीचा पाया मानला जातो. प्लासीच्या लढाईत (Battle of Plassey) नवाबाच्या सैन्याचा सेनापती मीर जाफरने विश्वासघात केला आणि 23 जून 1757 रोजी रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखालील ईस्ट इंडिया कंपनीच्या (East India Company) सैन्याकडून बंगालच्या सैन्याचा पराभव झाला. (वाचा सविस्तर)
Horoscope Today 02 August 2023 : मेष, धनु, मकर राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तर, कर्क राशीच्या लोकांना व्यवसायात मोठी संधी मिळू शकते. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा बुधवार नेमका कसा असणार आहे? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. (वाचा सविस्तर)