2nd August In History: बंगालच्या शेवटच्या नवाबाची ब्रिटिशांकडून कपटाने हत्या, फ्रान्सवर ताबा मिळवल्यानंतर हिटलरचा ब्रिटनवर हल्ला; आज इतिहासात
2nd August Important Events : दुसऱ्या महायुद्धात पॅरिस जिंकून घेतल्यानंतर हिटलरने आपला मोर्चा ब्रिटनकडे वळवला आणि 'ऑपरेनशन सी लायन'च्या (Operation Sea Lion) माध्यमातून ब्रिटनवर हल्ला चढवला.
2nd August In History: इतिहासात आजचा दिवस हा भारतासाठी काळा दिवस आहे. बंगालचा शेवटचा स्वतंत्र नवाब सिराज-उद-दौलाच्या (Siraj-Ud-Daulah) हत्येसह त्याच्या कारकिर्दीचा शेवट हा ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील राजवटीचा पाया मानला जातो. प्लासीच्या लढाईत (Battle of Plassey) नवाबाच्या सैन्याचा सेनापती मीर जाफरने विश्वासघात केला आणि 23 जून 1757 रोजी रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखालील ईस्ट इंडिया कंपनीच्या (East India Company) सैन्याकडून बंगालच्या सैन्याचा पराभव झाला. पराभवानंतर जवाब सिराज-उद-दौला 2 जुलै 1757 रोजी पकडला गेला. ईस्ट इंडिया कंपनीशी झालेल्या करारानुसार मोहम्मद अली बेगने नवाबाची हत्या केली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मीर जाफर यांच्यात सिराज-उद-दौलाच्या हत्येबाबत करार झाला होता. बंगालचा शेवटचा नवाब सिराज-उद-दौला याची कबर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील खुशबाग येथे आहे.
यासह आजच्या दिवसातील इतर महत्त्वाच्या घटना कोणत्या आहेत त्या पाहू,
1306: अलाउद्दीन खिलजीने सिवानावर हल्ला केला.
1757: प्लासीच्या लढाईत पराभवानंतर बंगालचा शेवटचा नवाब सिराज-उद-दौलाची हत्या.
1861 : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रफुल्लचंद्र राय यांचा जन्म
भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते अशी ओळख असलेल्या डॉ. प्रफुल्लचंद्र राय (Acharya Prafulla Chandra Ray) यांचा जन्म 2 ऑगस्ट 1861 रोजी बंगालमध्ये झाला. देशात स्वदेशी चळवळ जोरात असताना त्यांनी बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स ही कंपनी काढली. 1896 मधे त्यांनी पारा आणि नायट्रोजन यांच्या संयोग करुन मर्क्युरस नायट्रेटची निर्मिती केली. त्यांना 'मास्टर ऑफ नायट्रेट्स' म्हणत असत.
आचार्य राय हे आधुनिक रसायनशास्त्राचे पहिले भारतीय प्राध्यापक तर होतेच, पण त्यांनी या देशात रासायनिक उद्योगाचा पाया घातला. त्यांनी हिंदू रसायनशास्त्राचा इतिहास नावाचा एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिला, त्यामुळे त्यांना मोठी कीर्ती मिळाली. या पुस्तकाच्या माध्यमातून देश-विदेशातील शास्त्रज्ञांना प्राचीन भारतातील अज्ञात, विशेष रसायनशास्त्राचा साक्षात्कार झाला, ज्यांनी डॉ.राय यांचे भरपूर कौतुक केले. या पुस्तकाची भाषांतरे युरोपातील अनेक भाषांमध्ये प्रकाशित झाली असून या पुस्तकाच्या निमित्ताने डरहम विद्यापीठाने त्यांना डी.एस्सी. ची मानद पदवी प्रदान केली.
1922 - दूरध्वनी यंत्राचे जनक अमेरिकन वैज्ञानिक आणि अभियंता अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (Alexander Graham Bell) यांचे निधन.
1940: हिटलरचा ब्रिटनवर हल्ला, जर्मनीचे 'ऑपरेशन सी लायन' सुरू
ऑपरेशन सी लायन (Operation Sea Lion) हे नाझी जर्मनीचे ब्रिटनवरील नियोजित आक्रमणाचे कोड नाव होते. हे दुसरे महायुद्ध (World War 2) सुरू झाल्यानंतर नऊ महिन्यांनी जर्मनीने 2 ऑगस्ट 1940 रोजी ब्रिटनवर हल्ला केला. फ्रान्सची लढाई आणि त्या देशाच्या शरणागतीनंतर, जर्मनीचा सर्वोच्च कमांडर अॅडॉल्फ हिटलरला (Adolf Hitler) आशा होती की ब्रिटीश सरकार युद्ध समाप्त करण्याचा त्याचा प्रस्ताव स्वीकारेल. पण ब्रिटनने तसं काही केलं नाही. म्हणून शेवटचा पर्याय म्हणून त्याने ब्रिटनवर हल्ला करण्याचा आदेश दिला.
सुरूवातील आक्रमक असलेल्या जर्मन हवाई दल आणि नौदलाचे नंतर मात्र काही चालेना. ब्रिटनने कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचं स्पष्ट करत लढा सुरूच ठेवला.
1949 : व्हिएतनामला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली.
1962: सॅम वॉल्टनने रॉजर्स, आर्कान्सा येथे पहिले वॉलमार्ट स्टोअर उघडले.
1979 - साली महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोर गरिबांसाठी आरोग्य सेवा सुरु करणारे दापत्य डॉ. रजनीकांत आरोळे आणि त्यांच्या पत्नीस रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1979: महिला कार्यकर्त्या सुसान बी. अँथनी यांच्या स्मरणार्थ नाणे जारी
सुसान बी. अँथनी (Susan Anthony) या एक अमेरिकन सामाजिक सुधारक आणि महिला हक्क कार्यकर्त्या होत्या. त्यांनी महिलांच्या मताधिकार चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली. सामाजिक समानतेसाठी वचनबद्ध असलेल्या क्वेकर कुटुंबात जन्मलेल्या, त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी स्त्रियांच्या गुलामगिरीविरोधी याचिका गोळा केल्या होत्या.
1985: आंद्रेई ग्रोमिको सोव्हिएत युनियनच्या अध्यक्षपदी निवडून आले.
1993: एका अध्यादेशाद्वारे ओएनजीसीचे कॉर्पोरेशनमध्ये रूपांतर करण्यात आले.
2002: संपूर्ण भारतात हिपॅटायटीस सी चाचणी अनिवार्य करण्यात आली.