GST Collection News : जुलै महिन्यात GST महसुलात 11 टक्क्यांची वाढ, सलग पाचव्या वेळेस GST संकलन 1.60 लाख कोटीच्या पुढे
जुलै महिन्यात 1,65,105 कोटी रुपयांचे GST संकलन झाले आहे. हे संकलन मागील वर्षीच्या म्हणजे जुलै 2022 च्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढले आहे.
GST Collection News : जुलै महिन्यात जीएसटी महसुलात (GST collections) चांगली वाढ झाली आहे. जुलै महिन्यात 1,65,105 कोटी रुपयांचे GST संकलन झाले आहे. हे संकलन मागील वर्षीच्या म्हणजे जुलै 2022 च्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे देशांतर्गत व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाल्याचं चित्र समोर आलं आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जीएसटी अस्तित्वात आल्यापासून सलग पाचव्या वेळेस जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. जीएसटी संकलनात सीजीएसटी (सीजीएसटी) 29,773 कोटी रुपये, एसजीएसटी (एसजीएसटी) रुपये 37,623 कोटी आणि आयजीएसटी (आयजीएसटी) रुपये 85,930 कोटी आहे. ज्यामध्ये वस्तूंच्या आयातीतून 41,239 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. तर सेसद्वारे 11,779 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये 840 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीतून वसूल करण्यात आले आहेत. सरकारनं IGST ते CGST कडे 39,785 कोटी रुपये आणि SGST कडे 33,188 कोटी रुपये सेटल केले आहेत. नियमित सेटलमेंटनंतर, जुलै 2023 मध्ये, CGST मधून केंद्राचा महसूल 69,558 कोटी रुपये आणि SGST मधून राज्यांचा महसूल 70,811 कोटी रुपये आहे. जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये GST संकलनात 11 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे.
देशांतर्गत व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ
वार्षिक आधारावर जीएसटी महसुलात 11 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. त्यामुळं देशांतर्गत व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाल्याचं चित्र समोर आलं आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 15 टक्क्यांनी अधिक आहे. जीएसटी संकलनाचा आकडा 1.60 लाख कोटींच्या पुढे गेल्याची ही पाचवी वेळ असल्याची माहिती देखील अर्थ मंत्रालयानं दिली आहे.
जून 2023 मध्ये 1.61 लाख कोटी रुपयांचा महसूल
सरकारला जून 2023 मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) मधून 1.61 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. यामध्ये वार्षिक आधारावर 12 टक्क्यांची वाढ झाली होती. गेल्या वर्षी जून 2022 मध्ये 1.44 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. तर, दोनमहिन्यापूर्वी म्हणजे मे 2023 मध्ये ते 1.57 लाख कोटी रुपये होते. जून 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र टॉप पाच राज्यांमध्ये अव्वल होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलन 17 टक्के वाढून 26,098 कोटी रुपये झाले होते. या यादीत 11,193 कोटींच्या संकलनासह कर्नाटक दुसऱ्या तर गुजरात 10,119 कोटींच्या संकलनासह तिसऱ्या क्रमांकावर होते.
महत्त्वाच्या बातम्या: