एक्स्प्लोर

Morning Headlines 23rd June : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील..

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात कुणीही आक्रमकपणा दाखवू नये, नाव न घेता पंतप्रधान मोदींनी चीनला ठणकावलं 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ( Joe Biden) यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये  द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर अमेरिकन संसदेतील आपल्या भाषणात मोदींनी नाव न घेता चीनला ठणकावलं. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात कुणीही आक्रमकपणा दाखवू नये, असा इशारा मोदींनी दिला.  (वाचा सविस्तर)

भाजपविरोधी पक्षांची पाटणात आज बैठक, देशातील बडे नेते उपस्थित राहणार 

 बिहारची राजधानी असलेल्या पाटणा (Patan) इथं आज विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. भाजपविरोधातले 15 पक्ष या बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish kumar) यांनी या बैठकीचे आयोजन केलं आहे.  या बैठकीसाठी जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पार्टी तसंच इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. तर महाराष्ट्रातून देखील शरद पवार यांच्यासह इतर पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.  (वाचा सविस्तर)

आजपासून देशात पुन्हा पावसाची हजेरी, महाराष्ट्रासह 'या' राज्यांनाही मिळणार दिलासा

मान्सूनच्या (Monsoon) आगमनानंतर दडी मारुन बसलेला पाऊस आजपासून पुन्हा एकदा सक्रीय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. उत्तर भारतालाही उकाड्यापासून दिलासा मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  (वाचा सविस्तर)

 पंतप्रधान मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये खास डिनर, अंबानी, सुंदर पिचई यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती 

अमेरिकन संसदेतील भाषणानंतर मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अमेरिकन सरकारचे सर्व वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. (वाचा सविस्तर)

एअर इंडिया विमानाच्या कॉकपिटमध्ये मैत्रिणीला बसवणं महागात, पायलटचा परवाना एक वर्षासाठी रद्द

एअर इंडियाच्या (Air India) पायलटने त्याच्या अधिकारांचा गैरवापर करत आपल्या मैत्रिणीला विमानाच्या कॉकपिटमध्ये बसवलं आणि प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली. या प्रकरणी डीजीसीएने कारवाई करत पायलटचं लायसन्स एका वर्षासाठी रद्द केलं आहे.  (वाचा सविस्तर)

बेपत्ता टायटन पाणबुडीतील 'त्या' 5 जणांचा मृत्यू; स्फोटानंतर सापडले अवशेष

 टायटॅनिकचे (Titanic) अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या बेपत्ता पाणबुडीबाबत अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. नौदलाला बेपत्ता टायटन पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकन कोस्ट गार्ड अधिकाऱ्यांना टायटॅनिक जहाजाजवळ टायटन पाणबुडीचे काही अवशेष सापडले आहेत.  (वाचा सविस्तर)

 मेष, वृषभ, तूळसह 'या' राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य 

आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांनी आपली जीवनशैली बदलून योगासने करण्याची गरज आहे. कर्क राशीला आज जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा मंगळवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? (वाचा सविस्तर)

आजचा दिवस दोन मोठ्या विमान अपघातांचा साक्षीदार, एकाने संजय गांधींचा जीव घेतला, दुसऱ्यात 329 भारतीय ठार; आज दिवसभरात

आजचा दिवस हा भारतीय इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, जवळपास 33 वर्षांपूर्वी आजच्याच दिवसाने देशाच्या राजकारणातील सर्व समीकरणं बदलून टाकली. 23 जून 1980 रोजी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे धाकटे सुपुत्र संजय गांधी (Sanjay Gandhi) यांचे विमान अपघातात निधन झाले. इंदिरा गांधींचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून संजय गांधी यांच्याकडे पाहिले जात होते देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 23 जून या तारखेला नोंदवलेल्या इतर काही महत्त्वाच्या घटनांचा तपशील (वाचा सविस्तर)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 7.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्यSitaram Yechury Demise : सीताराम येचुरी यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरु होते उपचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
Embed widget