PM Modi US Visit: इंडो-पॅसिफिक क्षेत्रात कुणीही आक्रमकपणा दाखवू नये, नाव न घेता पंतप्रधान मोदींनी चीनला ठणकावलं
PM Modi US Visit: अमेरिका आणि भारताच्या अंतराळ मोहिमांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. आम्ही आर्टेमिस करारात सहभागी होण्यास तयार असल्याचे मोदी म्हणाले.
![PM Modi US Visit: इंडो-पॅसिफिक क्षेत्रात कुणीही आक्रमकपणा दाखवू नये, नाव न घेता पंतप्रधान मोदींनी चीनला ठणकावलं PM Narendra Modi US Visit modi on muslim minority in india indo Pacific relation after meeting with us president joe biden PM Modi US Visit: इंडो-पॅसिफिक क्षेत्रात कुणीही आक्रमकपणा दाखवू नये, नाव न घेता पंतप्रधान मोदींनी चीनला ठणकावलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/23/b7f74480f0424543db1325b8df459a7e168748356059389_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PM Narendra Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ( Joe Biden) यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर अमेरिकन संसदेतील आपल्या भाषणात मोदींनी नाव न घेता चीनला ठणकावलं. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात कुणीही आक्रमकपणा दाखवू नये, असा इशारा मोदींनी दिला. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भारताच्या अनेक गुणांचा देखील उल्लेख केला. आमच्याकडे 22 अधिकृत भाषा आहेत, प्रत्येत 100 किमीवर पदार्थ बदलतात, संस्कृती बदलते. मात्र या विविधतेचा आम्हाला अभिमान आहे, आम्ही ही विविधता साजरी करतो, असं मोदी म्हणाले. मोदींच्या भाषणाला अमेरिकेच्या खासदारांनी भरघोस प्रतिसाद दिला.
अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर पंतप्रधानांनी भाष्य केले आहे. भारत आणि अमेरिकेच्या रक्तामध्ये लोकशाही आहे. भारतात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले . तर या बैठकीत यु्क्रेन आणि रशियामधील युद्धासंदर्भात चर्चा झाली. तर भारत-अमेरिका मैत्रीसंबंध हे इतिहासातील सर्वात मजबूत, जो बायडन यांची बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली
भारत सर्वात मोठी लोकशाही असणारा देश
भारत हा लोकशाहीचा जनक, अमेरिका सर्वात जुनी लोकशाही तर भारत सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. जर ह्यूमन व्हॅल्यूज आणि ह्यूमन राईट नसेल तर लोकशाही नाही. असे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारत सर्वांच्या पाठिंब्याने, सर्वांच्या विश्वासाने चालतो. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. अमेरिकन संसदेला दोनदा संबोधित करणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत, याआधी ऑगस्ट 2016 मध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकन संसदेला संबोधित केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर अमेरिकन संसद वंदे मातरम, भारत माता की जय या घोषणांनी दणाणली.
आम्ही आर्टेमिस करारात सहभागी होण्यास तयार
अमेरिका आणि भारताच्या अंतराळ मोहिमांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. आम्ही आर्टेमिस करारात सहभागी होण्यास तयार असल्याचे मोदी म्हणाले. 30 वर्षांपूर्वी मी व्हाईट हाऊस बाहेरुन पाहायचो, आज व्हाईट हाऊस अमेरिकेतील भारतीय लोकांसाठी खुलं झालं, असे वक्तव्य व्हाईट हाऊसमधील स्वागतानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
अमेरिका बंगळुरू आणि अहमदाबाद येथे दुतावास सुरू करणार
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध मजबुत करण्यासाठी अमेरिका बंगळुरू आणि अहमदाबाद येथे दुतावास सुरू करणार आहे. अमेरिकेच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारतात 2500 राजकीय पक्ष, तर अधिकृत 22 भाषा असल्याची माहिती पंतप्रधानांनीअमेरिकेच्या संसदेत दिली. तर देशात 100 किमी अंतरावर खानपान बदलते, असे म्हणत मोदींनी भारतातील विविधतेचे वर्णन केले.
हे ही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)