Morning Headlines 20 July: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. Khalapur Irshalgad Landslide : माळीण-तळीयेची पुनरावृत्ती, खालापूरमध्ये गावावर दरड कोसळली, 30 ते 35 घरे मलब्याखाली
Khalapur IRSALVADI Village Landslide : मुंबईसह राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. बुधवारी रात्री खालापूरजवळील इरसालगड (इरसाल वाडी) येथे दरड कोसळून अनेक कुटुंब मलब्याखाली अडकून मृत्यूमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. वाचा सविस्तर
2. Khalapur Irshalwadi Landslide : रात्री मित्रांसोबत शाळेत झोपलेलो, तेवढ्यात मोठ्ठा आवाज झाला अन्...; बचावलेल्या तरुणाचा काळीज पिवळटणारा थरारक अनुभव
Khalapur Irshalwadi Landslide : रायगड (Raigad News) परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर (Irshalwadi) काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरडीखाली 30 ते 40 घरं दबल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाचा सविस्तर
3. Parliament Monsoon Session : संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून, 'या' मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत
Parliament Monsoon Session : संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून (20 जुलै) सुरु होत आहे. संसदेचे हे अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या कालावधीत संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण 17 बैठका प्रस्तावित आहेत. या अधिवेशनात 31 नवीन विधेयकं मांडली जाणार आहेत. या विधेयकांमध्ये दिल्ली अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी सरकार ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (दुरुस्ती) विधेयक, 2023 देखील समाविष्ट आहे. या अधिवेशनात मणिपूर हिंसाचार (Manipur Violence), महागाई (Inflation), ओडिशा रेल्वे दुर्घटना (Odisha Railway Accident), समान नागरी कायदा (UCC) यासह विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. वाचा सविस्तर
4. Indian Railways: केवळ 20 रुपये द्या अन् पोटभर जेवा; रेल्वे लवकरच राबवणार नवी योजना
Indian Railways IRCTC Meal: रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी. आता रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अगदी माफक दरात पोटभर जेवण दिलं जाणार आहे. देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर ही नवी योजना सुरू करण्याचा रेल्वेचा मानस असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, त्याआधी काही ठिकाणी केवळ चाचणी म्हणून ही योजना राबावण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार सुरू आहे. वाचा सविस्तर
5. Ahmedabad Accident : गुजरातमधील इस्कॉन पुलावर भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू तर 15 पेक्षा अधिक लोक जखमी
Ahmedabad Accident: गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथील इस्कॉन पुलावर (ISKON Bridge) झालेल्या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर या अपघातामध्ये (Accident) 15 ते 20 जण जखमी असल्याचं देखील म्हटलं जात आहे. माहितीनुसार, या इस्कॉन पुलावर मध्यरात्री एक चारचाकी आणि डंपरची जोरदार धडक झाली. या अपघात पाहण्यासाठी आजूबाजूला बरीच गर्दी जमू लागली होती. तेव्हाच मागून एक गाडीने येऊन लोकांना चिरडलं. वाचा सविस्तर
6. ABP C Voter Survey: सोनिया गांधी मिशन 2024 साठी अॅक्शन मोडमध्ये, कोणाचं वाढणार टेन्शन? सर्वेक्षणातून लोकांचा कल समोर
ABP C Voter Survey: 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) भाजप (BJP) विरोधी पक्षांनी एकजुट केली आहे. 18 जुलै रोजी एनडीएच्या घटक पक्षांची दिल्लीत बैठक झाली, तेव्हा विरोधी पक्षांनीही बंगळुरूमध्ये आपली ताकद दाखवली. विशेष म्हणजे, भाजप असो वा काँग्रेस, दोघांनीही छोट्या पक्षांना एकत्र करण्याची मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांच्या काँग्रेसच्या वतीनं सोनिया गांधी (Sonia Gandhi) स्वत: यासाठी अॅक्शन मोडमध्ये आहेत. याबाबत सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी अखिल भारतीय सर्वेक्षण केले असून, त्यात धक्कादायक उत्तरे मिळाली आहेत. वाचा सविस्तर
7. Parliament Monsoon Session: मणिपूर हिंसा, महागाई, UCC आणि महिला आरक्षण; दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीमध्ये 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा
Parliament Monsoon Session 2023: दिल्लीत (Delhi) पार पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये मणिपूर हिंसाचार, महागाई, दिल्ली अध्यादेश, समान नागरी कायदा, महिला आरक्षण यांसरख्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज (20 जुलै) रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात होणार आहे. त्याचपार्श्वभूमीवर दिल्लीत बुधवारी (19 जुलै) रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली आहे. वाचा सविस्तर
8. Seema Haider : ज्युली, इकरा, सपला... सीमा हैदरच नाही तर या मुलींनीही प्रेमासाठी 'सीमा' ओलांडली
Seema Haider : गेल्या काही दिवसांपासून सीमा हैदर भारत-पाकिस्तानमधील वादविवाद अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. यूपीचे एटीएस सीमा हैदरची चौकशी करत आहे. या दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सीमा हैदरची प्रेमकहाणी खरी आहे की तिने सचिन मीनाला कोणाच्या सांगण्यावरून हनी ट्रॅपमध्ये अडकवले? याचं उत्तर तपास यंत्रणेतून समोर येईल. मात्र, प्रेमात पडलेल्या मुलीची सीमा ओलांडून भारतात येण्याची ही पहिलीच घटना नाही. सीमा हैदरसारखी आणखी काही प्रकरणेही समोर आली आहेत. वाचा सविस्तर
9. Horoscope Today 20 July 2023 : वृषभ, तूळ, कुंभसह 'या' राशीच्या लोकांना सावधानतेचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
Horoscope Today 20 July 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कन्या राशीच्या लोकांनी कोणताही व्यवसाय केला तर तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो. मीन राशीच्या लोकांच्या कायद्याशी संबंधित प्रकरणे सुटू शकतात. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा गुरुवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर