एक्स्प्लोर

Horoscope Today 20 July 2023 : वृषभ, तूळ, कुंभसह 'या' राशीच्या लोकांना सावधानतेचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 20 July 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 20 July 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कन्या राशीच्या लोकांनी कोणताही व्यवसाय केला तर तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो. मीन राशीच्या लोकांच्या कायद्याशी संबंधित प्रकरणे सुटू शकतात. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा गुरुवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ राहील. आज आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि तुमच्या आयुष्यात काही बदल देखील होऊ शकतात. मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला उत्पन्नाच्या अधिक संधी मिळतील. तसेच, सामाजिक स्तरावर काम करणाऱ्यांचा सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार महत्त्वाचा आहे. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमच्या कामातील प्रगतीमुळे तुमचा कुटुंबात आदर वाढेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर बाहेर फिरण्याची योजना करू शकता. हा प्रवास तुमच्यासाठी खूप शुभ असेल. तुम्ही खूप भावनिक व्यक्ती आहात त्यामुळे तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आपल्या भावना कोणासमोर व्यक्त करू नका, अन्यथा लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. तुमची वागणूक सभ्य ठेवा. कठोर शब्द वापरू नका. नोकरीच्या क्षेत्रात सहजपणे ऑफर मिळू शकतात. विरोधकांपासून सावध राहा, नाहीतर ते तुमच्यावर गंभीर आरोप करू शकतात. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. वैवाहिक जीवनात चढ-उतारांचा सामना करावा लागेल. नोकरदार लोकांना आज नोकरी बदलीसंबंधी कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. स्पर्धेत पुढे राहा. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. आज तुमचा तुमच्या जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो, पण तुम्ही तुमच्या समजुतीने तो वाद संपवू शकाल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढा आणि त्यात तुम्ही तुमच्या चांगल्या-वाईट वर्तनावर चिंतन करा तसेच तुमच्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करा. तुमचे मित्र तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येतील, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. आज तुम्ही कौटुंबिक कामात व्यस्त असाल. घराची सजावट आणि दुरुस्तीवर जास्त पैसा खर्च होऊ शकतो. नवीन पाहुण्यांच्या आगमनामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. खाण्यापिण्याकडे लक्ष देण्यासोबतच आपल्या आजूबाजूच्या स्वच्छतेचीही काळजी घ्या. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नोकरदार लोकांना नोकरीत नवीन कराराचा फायदा होईल. मानसिकदृष्ट्या खूप हलके वाटेल. विवाहित लोक त्यांच्या घरगुती जीवनात आनंदी दिसतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. उद्या एखाद्या मित्रामुळे तुम्ही अडचणीत येण्याचे टाळू शकाल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. जे प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना आज चांगली डील मिळू शकते.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहिल. सर्वजण एकत्र काम करताना दिसणार आहेत. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना कराल. आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारेल, परंतु आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश करा. उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना आज तुमच्या नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. याचा भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. अधिकाऱ्यांशी बोलताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जीवनशैलीच्या वस्तूंकडे कल वाढेल, त्यामुळे जास्त खर्च होईल. घरात सुख-शांती नांदेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरदार लोकांना उद्या नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. तुमचे स्थानही वाढेल. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला जाणार आहे. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. आज नेत्यांनाही भेटण्याची संधी मिळेल, त्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल. कटू गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. रागावर नियंत्रण ठेवा. बोलण्यात गोडवा ठेवा. सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी वडिलांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कार्य पूर्ण होतील. 

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात इच्छित नफा मिळाल्यानंतर ते खूप आनंदी होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही परत करु शकता. खर्च आणि गुंतवणूक वाढत राहतील. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही खरेदी कराल. लोकांकडून प्रशंसा मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांना यश मिळेल. आज तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या व्यवसायात लाभ होईल. आळशीपणामुळे तुम्ही तुमची कामे उद्यावर ढकलू शकता. तुम्ही तुमचे विचार तुमच्या पालकांबरोबर शेअर करा. कार्यक्षेत्रात वरिष्ठ आणि कनिष्ठांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुम्ही तुमची कामे वेळेपूर्वी पूर्ण करू शकाल. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर खूप आनंद होईल. आज धार्मिक स्थळांना भेट द्या. तुम्हाला प्रसन्न वाटेल. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी आहे. आज तुम्हाला राजकारणात यश मिळेल. तरूणांसाठी आज त्यांचे प्रेम जीवन चांगले राहील. तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर रोमँटिक डिनरवर जाल. व्यवसाय करणारे लोक देखील व्यवसायाशी संबंधित सहलीला जाण्याची शक्यता आहे, जे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असेल. आज तुम्हाला पैशांची बचत करण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आज नवीन पाहुण्यांच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना आखा. जे घरबसल्या ऑनलाइन काम करतात, त्यांना चांगले पैसे मिळू शकतात.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुमचे रखडेले पैसे तुम्हाला परत मिळतील. आज तुम्हाला नातेवाईक किंवा मित्र मंडळींकडून भेटवस्तू मिळू शकतील. बँकिंग आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आज आर्थिक लाभ होऊ शकतो. बऱ्याच दिवसांपासून जर तुम्ही घर, शॉप, किंवा फ्लॅट घेण्याचा विचार करत असाल तर आज चांगला योग आहे. आरोग्य चांगले राहील. मुलांच्या भविष्यासाठी पैसे गुंतवा जेणेकरून येणाऱ्या काळात कोणतीही अडचण येणार नाही. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. आज स्वतःसाठी थोडी खरेदी करा. बऱ्याच दिवसांपासून तुमची दिनचर्या जर तीच असेल तर आज तुमच्या दिनचर्येत काही बदल करा त्यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. 

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 19 July 2023 : मेष, कन्यासह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खूप खास; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
Zodiac Personality: 'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांची 370 कलम रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका, राम मंदिर ट्रस्ट निर्मितीमध्ये योगदान, निवडणूक आयोगातील वर्षपूर्तीपूर्वीच बढती 
मार्च 2024 मध्ये निवडणूक आयोगात दाखल, वर्षभरात मुख्य निवडणूक आयुक्त, ज्ञानेश कुमार कोण आहेत?
Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025Gyanesh Kumar New Election Commissioner Of India :  ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवडABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025Eknath Shinde Vs Devendra Fadnavis | एका महायुती सरकारमध्ये किती प्रतिसरकार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather: मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
Zodiac Personality: 'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांची 370 कलम रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका, राम मंदिर ट्रस्ट निर्मितीमध्ये योगदान, निवडणूक आयोगातील वर्षपूर्तीपूर्वीच बढती 
मार्च 2024 मध्ये निवडणूक आयोगात दाखल, वर्षभरात मुख्य निवडणूक आयुक्त, ज्ञानेश कुमार कोण आहेत?
Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
Atul Kulkarni Poem:
"लोक चिरडले जातात... लोकांची प्रेतं बनतात..."; अतुल कुलकर्णींनी रचलेली नवी कविता 'लोक-मताची डुबकी'
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.