एक्स्प्लोर

Khalapur Irshalgad Landslide : माळीण-तळीयेची पुनरावृत्ती, खालापूरमध्ये गावावर दरड कोसळली, 30 ते 35 घरे मलब्याखाली

Raigad Khalapur IRSHALWADI Village  Landslide : रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 60 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अनेकांना वाचवण्यात यश आलेय. बचावकार्य अद्याप सुरु आहे.

Khalapur IRSALVADI Village Landslide : मुंबईसह राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. बुधवारी रात्री खालापूरजवळील इरसालगड (इरसाल  वाडी) येथे दरड कोसळून अनेक कुटुंब मलब्याखाली अडकून मृत्यूमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या गावात 50 ते 60 घरांची वस्ती असून जवळपास 200 ते 300  लोक असल्याचे समोर आलेय. प्राथमिक माहितीनुसार मलब्याखाली अंदाजे तीस ते 40 घरातील लोक अडकले आहेत. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 60 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अनेकांना वाचवण्यात यश आलेय. बचावकार्य अद्याप सुरु आहे.  नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील घरांजवळ ही घटना घडली. (Maharashtra Raigad Khalapur IRSHALWADI Village  Landslide incident happened know the updates )

इरसालवाडीमध्ये माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे. रायगडमधील तळीये आणि माळीण गावावर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. तळीये गावातील 35 घरांवर दरड कोसळली होती, यामध्ये 44 जणांचा मृत्यू झाला होता. तर माळीणमध्ये 151 जणांनी आपले प्राण गमावले होते. सकाळी माळीण गावावर डोंगर कोसळला, दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ माळीण गावातील 74 पैकी 44 घरे दबली गेली. जवळजवळ संपूर्ण गाव क्षणार्धात गायब! यामध्ये 151 जणांचा प्राण गेला होता. याच दुर्घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाली आहे. इरशाळगडमधील तीस पेक्षा जास्त घरावर दरड कोसळली आहे.  मलब्याखाली आणखी 40 ते 45 मृतदेह अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

इरशाळगड गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तात्काळ इरशाळगड  येथील दुर्देवी घटनेचा आढावा घेतला. त्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घटनास्थळाला जाण्याची शक्यता आहे.  

बचावकार्यात अडथळा 

दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. त्याशिवाय पोलिसही घटनास्थळावर पोहचले आहेत. अंधार आणि संततधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा होत आहे. त्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आले असून सकाळी पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. पावसामुळे अजूनही डोंगरावरची माती घसरतेय .. गावापर्यंत पोहोचण्याचा रस्ता बंद असून वाहने जात नाहीत, अर्धा तास चालत जावं लागत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Embed widget