एक्स्प्लोर

Morning Headlines 01 July : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

1. Buldhana Accident Live Updates : नागपूरहून पुण्याला  जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात, 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू, तर 8 प्रवासी सुखरुप असल्याची प्राथमिक माहिती

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झालाय. या बसमधील २५ जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर ८ प्रवासी सुखरूप आहेत. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. अपघात समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा गावाजवळ झालाय. नागपूरहून निघालेली ही बस रात्री साडे नऊ वाजता यवतमाळहून पुण्याकडे निघाली होती. मध्यरात्री दीड वाजता हा अपघात झाला. वाचा सविस्तर

2. Rule Change From July 2023: आजपासून देशात 'हे' 5 महत्त्वाचे बदल... HDFC मर्जर, LPG दर आणि RBI Floating Bond पर्यंत अनेक गोष्टी बदलल्या

Rule Change From July 2023: आजपासून जुलै (July 2023) महिना सुरू झाला असून प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यातही व्यवहारांत अनेक मोठे बदल झाले आहेत. यामध्ये स्वयंपाकघरापासून ते तुमच्या बँक खात्याशी संबंधित बदलांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. हे बदल (Rules Change From July 1) जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच, आज 1 जुलै 2023 पासून लागू केले जातील. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. आजपासून होणाऱ्या बदलांमधील सर्वात मोठा बदल बँकिंग क्षेत्राशी संबंधित आहे. HDFC बँक आणि HDFC Ltd चं विलीनीकरण आजपासून प्रभावी होत आहे. जाणून घेऊयात सर्व बदलांबाबत सविस्तर... 

3. LPG Cylider Price: LPG चे नवे दर जाहीर; आता किती रुपयांना मिळणार घरगुती अन् व्यावसायिक सिलेंडर?

LPG Cylinder Price on 1st July 2023: आज जुलै महिन्याचा पहिला दिवस. आज 1 जुलैपासून एलपीजी सिलेंडरचे (LPG Cylinder) नवे दर जारी करण्यात आले आहेत. इंडियन ऑईलच्या (Indian Oil) वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, 14.2 किलो एलपीजी सिलेंडर आणि 19 किलो कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत (Commercial Cylinder Price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच, या महिन्यात घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिरच आहेत. वाचा सविस्तर

4. Government Reduces GST Rate: मोबाईल फोन, टीव्हीसह अनेक गृहोपयोगी वस्तू स्वस्त; अर्थमंत्रालयाकडून GST मध्ये मोठी कपात, पाहा वस्तूंची यादी

Government Reduces GST Rate: अर्थ मंत्रालयानं (Ministry of Finance) सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. आता मोबाईल फोन, टीव्ही, रेफ्रिजरेटरसह अनेक गृहोपयोगी वस्तू (home applainces) स्वस्त होणार आहेत. अर्थ मंत्रालयानं अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी (GST) दरांत मोठी कपात केली आहे. अर्थ मंत्रालयानं अशा वस्तूंची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. पंखे, कुलर, गिझर इत्यादींवरील जीएसटी 31.3 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. वाचा सविस्तर 

5. Maharashtra Rain : महाराष्ट्र तहानलेलाच, जून महिन्यात फक्त 113.4 मिमी पावसाची नोंद; मराठवाड्यात सर्वात कमी पाऊस

Maharashtra Rain : महाराष्ट्रात कोकण आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर पाऊस (Rain) बरसत असताना दिसत असला तरी उर्वरीत महाराष्ट्रात (Maharashtra) अद्यापही हवा तसा पाऊस झालेला नाही. जून महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी 209.8 मिमी पाऊस होत असतो. मात्र, यावर्षी राज्यात 1 जून ते 30 जून दरम्यान फक्त 113.4 मिमी पाऊस बरसला आहे. राज्यात पावसानं सरासरी देखील गाठलेली नाही. संपूर्ण देशात सर्वात कमी पावसाची नोंद ही मराठवाड्यात झाली आहे. अशातच मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आव्हानं वाढली आहेत. वाचा सविस्तर 

6. Maharashtra Krishi Din : आज साजरा केला जातोय कृषी दिन जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Maharashtra Krishi Din : राज्यात दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन (Maharashtra Krishi Din) साजरा केला जातो. या निमित्ताने 1 जुलै ते 7 जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. वाचा सविस्तर 

7. Diamond League 2023: नीरज चोप्रानं रचला इतिहास; 87.66 मीटरवर भाला फेकत पटकावला 'लॉसने डायमंड लीग'चा खिताब

Neeraj Chopra wins Lausanne Diamond League with 87.66m throw: भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नीरज चोप्रानं लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यानं 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून पहिलं स्थान पटकावलं. या मोसमातील त्याचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी नीरजनं दोहा डायमंड लीगमध्ये भाला 88.67 मीटर फेकून पहिला क्रमांक पटकावला होता. वाचा सविस्तर 

8. 1st July In History: राष्ट्रीय डॉक्टर दिन, राज्य कृषी दिन, वसंतराव नाईक यांचा जन्म; आज इतिहासात

1st July In History: आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. अन्नदाता शेतकऱ्याच्या सन्मानार्थ आज राज्यात एक जुलै हा दिवस कृषी दिन साजरा केला जातो. हरितक्रांतीचे जनक  वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने हा दिवस साजरा करण्यात येतो. तर, भारतात आज राष्ट्रीय डॉक्टर दिनही साजरा करण्यात येतो. डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा होतो. त्याशिवाय इतरही महत्त्वाचे साजरे करण्यात येतात. वाचा सविस्तर 

9. Monthly Horoscope July 2023 : जुलै महिना 'या' राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक! 5 महत्त्वाच्या ग्रहांचे परिवर्तन, मासिक राशीभविष्य जाणून घ्या

Monthly Horoscope July 2023 : आजपासून जुलै महिना सुरू झाला आहे. नवीन महिना अनेक राशींसाठी खूप शुभ असणार आहे. हा महिना अनेकांना यशाकडे घेऊन जाणारा ठरेल. तर, दुसरीकडे जुलै महिना काही राशींसाठी शुभ असणार नाही. जुलैमध्ये मेष राशीत राहू आणि गुरुच्या संयोगामुळे गुरु चांडाळ योग तयार होत आहे. काही राशीच्या लोकांच्या जीवनावर याचा खूप नकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घेऊयात जुलै महिन्याचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

10. Horoscope Today 01 July 2023 : मिथुन, कन्या, धनु, कुंभसह सर्व राशींसाठी जुलैचा पहिला दिवस कसा असेल; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Horoscope Today 01 July 2023 : आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीचे लोक आपल्या मित्रांबरोबर नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखतील. कन्या राशीचे लोक नेमून दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील. आजचा शनिवार मेष ते मीन राशीसाठी कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 7.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्यSitaram Yechury Demise : सीताराम येचुरी यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरु होते उपचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
Embed widget