search
×

Government Reduces GST Rate: मोबाईल फोन, टीव्हीसह अनेक गृहोपयोगी वस्तू स्वस्त; अर्थमंत्रालयाकडून GST मध्ये मोठी कपात, पाहा वस्तूंची यादी

Government Reduces GST Rate: अर्थ मंत्रालयानं काही वस्तूंची यादी जाहीर केली आहे. पंखे, कुलर, गिझर इत्यादींवरील जीएसटी 31.3 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.

FOLLOW US: 
Share:

Government Reduces GST Rate: अर्थ मंत्रालयानं (Ministry of Finance) सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. आता मोबाईल फोन, टीव्ही, रेफ्रिजरेटरसह अनेक गृहोपयोगी वस्तू (home applainces) स्वस्त होणार आहेत. अर्थ मंत्रालयानं अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी (GST) दरांत मोठी कपात केली आहे. अर्थ मंत्रालयानं अशा वस्तूंची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. पंखे, कुलर, गिझर इत्यादींवरील जीएसटी 31.3 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.

जीएसटीमध्ये मोठी कपात

मोबाईल फोन (Mobile), एलईडी बल्ब (LED Bulb), टीव्ही (TV), फ्रीजसह घरगुती उपकरणांवरील जीएसटी (GST Rate) मध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल फोन, स्मार्ट टीव्ही, एलईडी बल्ब, फ्रीज, यूपीएस, वॉशिंग मशिनवरील जीएसटी 31.3 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयानं ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

अर्थमंत्रालयाकडून कोणत्या वस्तूंवरील जीएसटीत घट?

स्वस्त झालेल्या वस्तूंची यादी

  • टीव्ही (27 इंचापेक्षा कमी)
  • रिफ्रेजरेटर 
  • वॉशिंग मशीन
  • इलेक्ट्रिक अप्लायन्स (मिक्सर, व्हॅक्युम क्लिनर, ज्युसर)
  • एलपीजी शेगडी
  • एलईडी बल्ब 
  • शिलाई मशीन
  • स्टॅटिक कन्व्हर्टर्स
  • प्रेशर लॅन्टर्न
  • व्हक्युम फ्लास्क 
  • मोबाईल फोन

27 इंच किंवा त्यापेक्षा कमी आकाराचा टीव्ही स्वस्त 

जीएसटीच्या नव्या दरांनुसार, जर तुम्ही 27 इंच किंवा त्यापेक्षा कमी आकाराचा टीव्ही खरेदी केला, तर तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी पैसे द्यावे लागतील. तसेच, बहुतेक कंपन्या किमान 32 इंच किंवा त्याहून अधिक आकाराचे टीव्ही तयार करतात. 32 इंच किंवा त्याहून अधिक आकाराच्या टीव्हीवर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीप्रमाणेच त्यांच्यावर 31.3 टक्के जीएसटी लागू होईल.

मोबाईल फोनच्या किमतींतही घट

अर्थ मंत्रालयानं मोबाईलवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीमध्येही घट केली आहे. यापूर्वी मोबाईलवर 31.3 टक्के जीएसटी आकारला जात होता, आता हा जीएसटी 12 टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच, आता तुम्ही नवा मोबाईल खरेदी केला तर तुम्हाला मोबाईलच्या किमतीवर केवळ 12 टक्केच जीएसटी द्यावा लागणार आहे. अर्थ मंत्रालयानं जीएसटीवरील किमतींत घट केल्यामुळे मोबाईल उत्पादक कंपन्या मोबाईच्या किमती कमी करु शकतात. एकंदरीत येत्या सणासुदीच्या काळात मोबाईल फोन खरेदी केल्यास कमी पैसे मोजावे लागतील. 

'या' महिन्यात लॉन्च होणारे फोन, यावर मिळू शकतो जीएसटी कपातीचा फायदा

Smartphone: नवीन फोन विकत घेण्याचा विचार करताय? जुलै महिन्यात जबरदस्त स्मार्टफोन्स होत आहेत लाँच, जाणून घ्या किमत

Published at : 01 Jul 2023 07:48 AM (IST) Tags: mobile phone GST Ministry of Finance

आणखी महत्वाच्या बातम्या

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

पगार येतो पण पैसा टिकत नाही, नेमकं काय करावं? 'हा' फॉर्म्युला वापरा, भरपूर पैसे मिळवा

पगार येतो पण पैसा टिकत नाही, नेमकं काय करावं? 'हा' फॉर्म्युला वापरा, भरपूर पैसे मिळवा

टॉप न्यूज़

खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 

खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 

Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!

Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?