search
×

Rule Change From July 2023: आजपासून देशात 'हे' 5 महत्त्वाचे बदल... HDFC मर्जर, LPG दर आणि RBI Floating Bond पर्यंत अनेक गोष्टी बदलल्या

Rule Change From Today: आजपासून आर्थिक व्यवहारांतील अनेक नियम बदलणार असून या बदलांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे.

FOLLOW US: 
Share:

Rule Change From July 2023: आजपासून जुलै (July 2023) महिना सुरू झाला असून प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यातही व्यवहारांत अनेक मोठे बदल झाले आहेत. यामध्ये स्वयंपाकघरापासून ते तुमच्या बँक खात्याशी संबंधित बदलांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. हे बदल (Rules Change From July 1) जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच, आज 1 जुलै 2023 पासून लागू केले जातील. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. आजपासून होणाऱ्या बदलांमधील सर्वात मोठा बदल बँकिंग क्षेत्राशी संबंधित आहे. HDFC बँक आणि HDFC Ltd चं विलीनीकरण आजपासून प्रभावी होत आहे. जाणून घेऊयात सर्व बदलांबाबत सविस्तर... 

एलपीजीच्या किमती स्थिर  (LPG Cylinder Price)

तेल वितरण कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींत बदल करतात, ज्याचा परिणाम देशभरात दिसून येतो. यावेळी कंपन्यांनी एलपीजीच्या किमतींत कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या सलग दोन महिन्यांपासून कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींत कपात करून दिलासा दिला होता.

यापूर्वी, मागील महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच, 1 जून 2023 रोजी सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त करण्यात आला होता, तर यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक सिलेंडरची किंमत 172 रुपयांनी कमी करण्यात आली होती. दरम्यान, घरगुती स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या 14 किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही.

1 जून 2023 रोजी सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त करण्यात आला होता, तर यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक सिलेंडरची किंमत 172 रुपयांनी कमी करण्यात आली होती. दरम्यान, घरगुती स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या 14 किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही.

HDFC-HDFC बँक विलीनीकरण (HDFC Bank Merger)

देशातील सर्वात मोठी हाऊसिंग कंपनी एचडीएफसी (HDFC) आणि एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच 1 जुलैपासून विलिनीकरण होणार आहे, अशी माहिती एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी दिली होती. या विलिनीकरणानंतर एचडीएफसी फायनान्स एचडीएफसी बँकेचाच एक भाग बनेल. विलिनीकरणासाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, काल (30 जून) बाजार बंद झाल्यानंतर एचडीएफसी बोर्डाची या प्रक्रियेसाठीची अखेरची बैठक पडली. या विलीनीकरणाच्या प्रक्रियेनंतर एचडीएफसी बँक जगातील सर्वात व्हॅल्यूएबल बँकांच्या यादीत सामील झाली आहे. आता HDFC बँक जगातील चौथी व्हॅल्यूएबल बँक बनणार आहे. 

एचडीएफसी कंपनी 13 जुलैपासून ‘एचडीएफसी बँक' नावाने आपले शेअर ट्रेड करणार असल्याची माहिती देखील एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी दिली होती. एचडीएफसी बँकेनं गेल्या वर्षी 4 एप्रिल रोजी एचडीएफसीचे अधिग्रहण करण्याचे मान्य केलं होते. लवकरच होणाऱ्या प्रस्तावित संस्थेची एकत्रित मालमत्ता सुमारे 18 लाख कोटी रुपयांची असेल. एचडीएफसी बँक आणि एचडीएसएफ लिमिटेड यांच्या विलिनीकरणानंतर एचडीएफसी बँक ही जगातील पाचवी सर्वात मोठी बँक बनेल. एप्रिल 2023 पर्यंत HDFC बँक जगातील मार्केट कॅपमध्ये अकराव्या क्रमांकावर होती.

आरबीआय फ्लोटिंग सेव्हिंग बाँड (RBI Floating Savings Bond)

आजच्या काळात, सर्वोत्तम गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये, मुदत ठेव अर्थात एफडीला अधिक महत्त्व दिलं जातं. सर्व बँका यांवर ग्राहकांना भरघोस व्याज देतात. आज, 1 जुलै 2023 पासून, इन्वेस्टमेंट इंस्ट्रूमेंट  FD पेक्षा चांगलं व्याज मिळणार आहे. आम्ही RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्ड्स 2022 (RBI Floating Rate Savings Bonds 2022) बद्दल बोलत आहोत, जरी त्याचं व्याज दर नावाप्रमाणे स्थिर नसले तरीही आणि ते वेळोवेळी बदलत राहतात. सध्या 7.35 टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. ते 1 जुलैपासून 8.05 टक्के करण्यात आलं आहे.

बँकांमधील कामाला 15 दिवसांची सुट्टी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जुलै 2023 मध्ये बँक हॉलिडेची यादी प्रसिद्ध केली आहे. या महिन्यात देशभरातील विविध राज्यांमध्ये विविध कार्यक्रम किंवा उत्सवांमुळे एकूण 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्यांमध्ये रविवारसह दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे. अर्थात यातील अनेक सुट्ट्या या त्या-त्या प्रदेशांमध्ये दिल्या जातात. 

निकृष्ट दर्जाचे शूज आणि चप्पल विकण्यास बंदी 

केंद्र सरकारनं क्वॉलिटी कंट्रोल ऑर्डर (QCO) लागू करण्याची घोषणा केली आहे, त्याची अंमलबजावणी आज 1 जुलैपासून होणार आहे. यानंतर, सर्व फुटवेअर कंपन्यांनी गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे नियम पाळणं आवश्यक असेल. म्हणजेच 1 जुलै 2023 पासून देशभरात निकृष्ट दर्जाच्या पादत्राणांच्या निर्मिती आणि विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Published at : 01 Jul 2023 08:52 AM (IST) Tags: CNG PNG NEW RULE LPG cylinder rule change

आणखी महत्वाच्या बातम्या

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

टॉप न्यूज़

शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार

अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार

T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  

T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  

Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी

Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी